अकोट बसस्थानकातील प्रवाश्यांच्या मुलभुत सुविधांसाठी लोकजागर मंचचे निवेदन

0
676
Google search engine
Google search engine

आकोटः-

अकोट बसस्थानकात
प्रवाश्यांच्या मुलभुत सुविधांच्या समस्येसंदर्भात लोकजागर मंच ने आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली.तसेच सुविधा उपलब्ध करुन प्रवाश्यांची गैरसोय टाळण्याबाबत निवेदन देण्यात आले.निवेदनात
स्थानिक बस आगरात प्रवाश्यांच्या पिण्याचे पाण्याची व्यवस्था नाही, शौचालय व मुतारी मध्ये स्वच्छता नाही, सेफ्टीक टॅंकवर झाकण नसून टाकी सताड उघडीच आहे,उघड्या टाकीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. उघड्या टॅंक मुळे अपघात ही होऊ शकतो. मुख्य प्रवेशद्वारा वरील वर स्थानकातील ईतर भागात पावसाचे पाण्याचे डबके साचलेले आहेत, परीसरात लोकांचे अवैध वास्तव्य आहे.तसेच आवारात डुकरांचा श्वानांचा मुक्त संचार आहे. व्यवसायिक व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या पासची सुविधा नाही.आदींबाबत अवगत करण्यात आले. या सर्व समस्या व ईतर विषयांचे निवारण करण्यासाठी लोकजागर मंचच्या कार्यकर्ता पदाधिकारींच्या वतीने निवेदन देण्यात आले. आगार व्यवस्थापक यांचेशी वरील बाबींवर सांगोपांग चर्चा करून वरिष्ठ पातळीवर सर्व बाबींचा पाठपुरावा करून निराकरण करण्यासठी सहकार्य करण्याचे ठरले. यावेळी जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार,ता उपाध्यक्ष योगेश जायले, कार्याध्यक्ष आकाश बरेठिया, देवा कायवाटे, अक्षय गावंडे, शैलेश इंगोले, गजानन रावणकार,अभिजीत कोकाटे, रवींद्र वालसिंगे, अक्षय मामनकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.