महाविद्यालय निवडणुकी संदर्भात युवासेनेची बैठक

0
1122
Google search engine
Google search engine

आकोटः प्रतिनिधी-

अकोट मतदारसंघात होणाऱ्या दौऱ्यांची मोर्चेबांधणीची पाहणी करण्याकरिता तसेच पक्ष संघटन ,महाविद्यालय निवडणुका आदींबाबत शिवसेना सम्पर्कप्रमुख भास्करजी ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता युवासेनेच्या सर्व पदाधिकार्यांनी आपल्या सर्कल मध्ये मोर्चेबांधणीला लागावे असे आवाहन युवासेनेचे विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे यांनी केले.. तसेच कॉलेजमध्ये होणाऱ्या निवडणूका लक्षात घेता संपूर्ण जबाबदारी युवासेनेच्या सर्व पदाधिकारी व युवासैनिकांची राहील असे त्यांनी सुचित केले.

यावेळी युवासेना विस्तारक तथा उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कार्तिक गावंडे, युवासेना अकोट तालुका संघटक कुणाल कुलट, युवासेना तालुकाप्रमुख अजय लेलेकर, अक्षय घायल, युवासेना तालुका समन्वयक विशाल चौधरी, युवासेना तालुका सचिव विजय भारसाकळे, युवासेना सरचिटणीस संतोष तायडे, उपतालुकाप्रमुख अंकुश कुलट, युवासेना उपतालुकाप्रमुख रितेश उजिले, युवासेना उपतालुकाप्रमुख गौरव हिंगणकर,युवासेना उपतालुका संघटक अंकुश लोखंडे, विशाल कुलट, शिवम हेंड, मोंटू हिंगनकर, संजय रेळे, विद्यापीठ प्रतिनिधी शिवा रेळे, निशांत सर्पे, प्रणव चोरे, यांच्यासह आकोट तालुक्यातील सर्व युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते असे युवासेनेच्या वतीने कळविण्यात आले आहे