सर्वोदय विद्यालय सिंदेवाही येथे पालक-शिक्षक सभा संपन्न

0
496
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि- विद्यार्थांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांचा मोठा वाटा आहे, त्याकरिता पालक-शिक्षक सहविचार सभांची गरज आहे असे मत सर्वोदय विद्यालय सिंदेवाही चे प्राचार्य हरिभाऊ पाथोडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चे वतीने नुकतीच आयोजित पालक-शिक्षक सभेत अध्यक्षस्थानावरून प्रा. पाथोडे बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास बाल्लावार यांनी केले. यावेळी सत्र २०१९-२० करीता पालक-शिक्षक संघाची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष- प्राचार्य हरिभाऊ पाथोडे, उपाध्यक्ष- शशिकांत कामतवार, सचिव- प्रदिप मेश्राम, सहसचिव- मिथून शेंडे यांची निवड करण्यात आली. माता-पालक संघाकरीता प्रतिभा थेरकर, लता मुठ्ठावार यांची निवड झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री कोल्हे तर आभार प्रदीप मेश्राम यांनी मानले.