वसंत वारजुकर यांचे कडून ठाकरे कुठूबियांना आर्थिक मदतीचा हाथ

0
528
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधि- सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील रहीवासी कळमकर यांच्या राहत्या घरी किरायाने राहणारे विजय ठाकरे हे नेहमी प्रमाणे आपल्या परिवारासोबत घरी गाळ झोपलेले होते सोबतच काल रात्रोच्या पावसामुळे ठाकरे यांचे राहते घर कोसळल्याने त्यांचे घरातील अन्न-धान्य व साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. विजय ठाकरे यांची पतिस्थिती हलाखीची असल्यामुळे नवरगाव येथील कार्यकर्त्यांनी वसंत वारजुकर यांना फोन करून संपूर्ण महिती दिली असता वसंत वारजुरकर लगेच ठाकरे यांचे घरी भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत दिली. यावेळी ग्राम पंचायत सदस्य कमलाकर बोरकर, रमेश बोरकर, श्रीकांत हेडावू, प्रदीप ठाकरे, हर्षद बोरकर व कार्यकर्ते उपस्थित होते.