सिंदेवाही बस स्थानकात अभ्यासिका वर्गासाठी खोली उपलब्ध करुन देण्याची पत्रकार संघाची मांगनी

0
902
Google search engine
Google search engine

सिंदेवाही तालुका प्रतिनिधि- सिंदेवाही नगर पत्रकार संघाच्या वतीने सिंदेवाही येथील बस स्थानकात अभ्यासिका वर्गासाठी खोली उपलब्ध करुण देण्याच्या मागणीचे निवेदन पत्रकार संघाच्या वतीने नुकतेच वाहतुक नियंत्रक यांच्या मार्फत आगार प्रमुख यांना देण्यात आले.

सिंदेवाही येथे खेड्या-पाड्यातुन शिक्षणासाठी विद्यार्थी तालुका स्थारावर येत असतात त्यानंतर शाळा, काँलेज सुटल्यावर बस स्थानकावर बसची वाट पाहत असतात त्यामुळे विद्यार्थांचा अमूल्य वेळ वाया जाते.

सिंदेवाही नगर पत्रकार संघाकडुन विद्यार्थांच्या सर्वंगीन विकासासाठी स्पर्धा परीक्षा तसेच नियमित अभ्यासासाठी गरीब व होतकरू विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी बस स्थानक येथे अभ्यासिका वर्गासाठी खोली उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदना मार्फत करण्यात आली. सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेन्द्र फडनविस, सुधिरभाऊ मुनगंट्टीवार यांना देण्यात आले.

यावेळी सिंदेवाही नगर पत्रकार संघाचे वहाबअली सय्यद, भगवंत पोपटे, लक्ष्मीकांत, कामतवार, खालीद पठान, अजय बलगेवार, विलास धुळेवार व  सोमेश्वर पाकवार आदी ची उपस्थित होते.