पत्रकारांची नोंदणी शासनदरबारी करण्याकरीता सिंदेवाही नगर पत्रकार तर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्रीला निवेदन

0
630
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी- राज्य सरकावर व केंद्र सरकार केवळ अधिस्वीकृती पत्रिका धारक असलेल्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार समजते व तशी शासन दरबारी नोंदणी केलेली असते अश्या अधिस्वीकृती असलेल्या पत्रकारांना केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेचा लाभ मिळतो इतर पत्रकारांना लाभ मिळत नाही हे सरकारचे धोरण चुकीचे असून इतर हजारो पत्रकारांवर अन्याय होत असून महाराष्ट्र मध्ये शहरी व ग्रामीण भागातील हजारो पत्रकार जीवावर जीवघेणी जोखीम पत्करून अल्प मानधनावर विविध चॅनल्स ,दैनिके, सप्ताहिके युट्यूब चॅनल वेब पोर्टल, पाक्षिक, मासिके मध्ये काम करत आहेत त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या जाचक अटी मुळे अधिस्वीकृती पत्रिका मिळत नसल्याने त्यांना केंद्र सरकार व राज्य सरकार पत्रकार म्हणून मान्यता देत नसल्याने अश्या गरीब वंचित पत्रकारांना केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही ही बाब लक्षात घेऊन पत्रकार सुरक्षा समितीची राज्यातील सर्वच पत्रकारांची नोंदणी करावी व त्यांना पत्रकारांसाठी असलेली योजना मध्ये समावेश करावा म्हणून सिंदेवाही नगर पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे वाहाब अली भगवंत पोपटे लक्ष्मीकांत कामतवार खालीद शेख अजय बलगेवार विलास धुळेवार व सोमेश्वर पाकवार आदी ची उपस्थित होते.