*शिक्षक आमदारामध्ये सभागृहात बोलण्याची धमक नाही – संगीता शिंदे यांचा आरोप, शासनावर वेळकाढूपणाचा आरोप*

0
1104

Amravati :-
*विनाअनुदानित शिक्षक कृती समितीची पत्रपरिषद*

अनेक वर्षांपासून विनावेतन काम करूनही त्यांना अनुदान न देता आता पुन्हा एकदा शाळांचे मुल्यांकन करण्याचा शासनाने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे सांगत विनाअनुदानित शिक्षकांमध्ये त्यामुळे संतापाची लाट पसरली असल्याची भावना विनाअनुदानित कृती समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी असलेले शिक्षक आमदारच शिक्षकांचे प्रश्न संपूर्ण ताकदीने सभागृहात मांडत नसून त्यांच्यात सभागृहात बोलण्याची धमकच नसल्याचा आरोप शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांनी केला आहे.

श्रमिक पत्रकार भवनात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शिक्षकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्यावेळी बोलताना संगीता शिंदे यांनी सांगितले की, माजी आ. बी.टी. देशमुख यांनी सभागृहात शासनाला धारेवर धरत ‘कायम’ हा शब्द काढून टाकला आहे. त्यावेळी या शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना अनुदान मिळेल त्यांचे व त्यांच्या कुटूंबाचे भविष्य सुरक्षित होईल असा विश्वास निर्माण झाला आहे. मात्र कोणत्याही शासनाने आजवर शिक्षकांच्या या समस्येची दखलच घेतली नसून त्यांना चहाची टपरी, रेस्टॉरेंट वेटर अशी वेठबिगारीची कामे करावी लागत असल्याचे भयान वास्तव सांगितले.