काँग्रेस पक्षाने केला क्रांती दिवस साजरा….!

0
873
Google search engine
Google search engine

शासकीय अधिकारी विसरलेत आजचा दिवस
शेगांव:- आज दिनांक ०९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शहर व तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे क्रांती दिन साजरा केला .
परंतु सर्वात अगोदर काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्या तेथील असलेली घान साफ करावी लागली कारण प्रशासन चे अधिकारी आजचा दिवस विसरलेत त्या चौकाचे कोटी रुपय खर्च करून त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले परंतु त्याची देखभाल,साफसफाई कोण करणार याचा ठाव ठिकाणा नाही.कुंपणाच्या गेटला कुलूप लावले असते परंतु त्याला लावण्यात आलेले कुलापाची चाबी सुद्धा यान दिसत नव्हती. शेवटी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या कुंपणाच्या वरून जाऊन तेथे पडून असलेला घाण कचरा, दारूच्या बॉटल, आणखीन अनेक प्रकारचा घाण कचऱ्याची साफ सफाई केली तो परिसर पाण्यानी पूर्णपणे स्वच्छ केला. नंतर नेते मंडळी व कार्यकर्त्यांनी तेथील स्मारकाला हार व फुल चढून अभिवादन केले. काँग्रसचे शराध्यक्ष दीपक सलामपुरिया यांच्या अध्यक्षतखाली करण्यात आले सोबत तालुका काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजय काटोल, कैलास देशमुख, केशव हिंगणे, गोपाळ उज्जैनकार,शिवाजी माळी,प्रकाश शेगोकार,गजानन लहाने,प्रवीण निंबाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हे सर्व पाहता सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी यांना विसरले असावेत….? बहुतेक
३७० कलम रद्द करण्यात आली यांचा आनंदात सत्ताधारी क्रांति दिनाला सुद्धा विसरलेत असावे असो.
इतक्यावरच थांबता येणार नाही तर दोन जुलै रोजी परमवीर चक्र विजेता अब्दुल हमीद यांची जयंती होती त्यांनासुद्धा सत्ताधाऱ्यांनी चौकात जाऊन श्रद्धांजली नाही दिली आणि सैनिकांच्या माथे आम्ही जगतो आम्ही सुरक्षित राहतो हे म्हणायला भारतीय जनता पक्षाचा शिखराचा नेता सुद्धा मागे राहणार नाही पण या सैनिकांना भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अधिकारीवर्ग आज विसरले असे दिसते.
परंतु आज काँग्रेस कार्यकर्त्याने साफ केलेली घाण नगर परिषदचे डोळे उघडण्यासाठी मुख्यधिकारी यांच्या कार्यालयावर नेला व विचारणा केली परंतु मुख्यधिकरी साहेब कुठे दिसे नासे झालेत अधिकारीच जर कामचुकार पणा करत असेल तर जनतेने अपेक्षा कुणा कडे ठेवायच्या…?