सर्वोदय कन्या विद्यालयात, शालेय मंत्रिमंडळ गठीत

0
654
Google search engine
Google search engine

सिंदेवाही: तालुक्यातील सर्वोदय कन्या विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही येथे विद्यार्थ्यांना लोकशाही शासनप्रणालीची प्रात्यक्षिकाद्वारे ओळख व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजावे,यासाठी प्रत्यक्ष गुप्त मतदान पध्दतीने शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.
यामध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रियंका हटवादे,उपमुख्यमंत्री रेश्मा नागापुरे, शिक्षणमंत्री प्राची कुमरे,सांस्कृतिक मंत्री टीना गायकवाड, आरोग्य व स्वच्छता मंत्री प्रेरणा ठिकरे,क्रीडामंत्री जोत्सना लोखंडे, सहलमंत्री मेघा लोखंडे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून अतुल केकरे,प्रा.मनोज पाकमोडे,किशोर कावळे,विनय खोब्रागडे, सलामे यांनी तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा.संदीपान जोगी व संदिप भरडकर यांनी काम पाहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका कु.संगीता यादव यांनी नवनियुक्त मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ दिली.