मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी केरळ मधुन पथक पलुसमध्ये दाखल: जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख

जाहिरात
Slider

एकीकडे महापुराचे थैमान असताना हजारो लोकांचे स्थलांतरकरण्यात येत आहे. तर दुसरीकडे पशुधन वाचण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. अशातच प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून मुक्या जनावरांना वाचवण्यासाठी केरळ मधील एक मोठे पथक पलुस तालुक्यात दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुराने थैमान घातले आहे. परंतु गेल्या दोन दिवसापासून पुराच्या पाण्याची पातळी कमी होवू लागली आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्त लोकांना मदतीची गरज भासू लागली आहे. संसार उद्ध्वस्त झालेल्या या लोकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनासह अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते काम करीत आहेत. त्यानुसार आज शनिवारी पंचायत समिती पलूस येथे केरळ मधुन आलेल्या या पथकाला जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांनीसुचना व मार्गदर्शन केले.पलुस कडेगाव तालुक्यातील पुनदी, नागराळे, बुर्ली, आमणापूर अनुगडेवाडी,नागठाणे, सुर्यगांव, राडेवाडी,तावदरवाडी,भिलवडी,माळवाडी, सुखवाडी, चोपडे या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून केरळ मधून दाखल झालेले पथक जनावरांच्या बचावासाठी काम करणार आहे. त्यानुसार पशुधनावर मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.यावेळी सांगली जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पराग, पलूस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल रोकडे, कडेगाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय देशमुख तसेच पलुस पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।