ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात मतदान केंद्र द्या….नारायण जाम्भुळे

349

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात 322 मतदान केंद्र असून एका एका मतदान केन्द्राला 2 ते 4 गावे जोड़लेली आहेत. सदर गावे मतदान केंद्रापासून, त्या गावांचे अंतर 2 ते 5 कि मी आहे. प्रत्येक गावांचे अंतर , मतदान केंद्रापासून जास्तीत जास्त, एक कि मी चे आंत करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नारायण जाम्भुळे यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे कड़े पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.
आपल्या देशात लोकशाही मजबूत होण्या करिता प्रत्येक नागरिकाला आपली जवाबदारी व कर्तव्य समजावी, या करिता प्रत्येक मतदाराने मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता , मतदान केंद्र हे प्रत्येक गावापासुन जास्तीत जास्त, एक कि मी चे आंत करण्यात यावे. म्हणजेच जास्तीत जास्त मतदान होवू शकेल. याकरिता, “गाव तिथे बुथची संकल्पना राबवावी” अशी मागणी नारायण जाम्भुळे यांनी केली आहे.
ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील, झिलबोडी परसोडी, बेलादाटी,हतीलेंढा,गायडोंगरी, गवली चक, आकापुर रुपाला, शिवसागर परसाडी,गणेशपुर, पोहनपार, बेलगांव खुर्द, बोदरा, लोहार डोंगरी, शेलदा, मुरपार, गुजर, पुरकेपार, सरांडी, देवाड़ा, जाटलापूर, कारघाटा, खानाबाद, धानोरा, पांढरवाणी,पिपर हेटी,घोट, खैरी चक, मांगली, सावंगी दीक्षित मेहा खुर्द, ऊसरपार तुकुम, गेवरा चक, बारसागड, आसोला, हेटी, गोविंदपुर चक, मुरपार तुकुम, मोहबली, बामणी, अन्तरगाव गाय डोंगरी, भानापुर,नवेगांव तुकुम, भारपावली, सादागड़, विचोरा, बिजापुर, केसरवाही, मानसी वढोली,पेटगाव रे, सिंगापुर, भट्टी जाम्ब, उमरी ही गावे,सध्या मतदान केन्द्रापासुन एक ते पाँच कि मी चे अंतरावर असल्याने, या गावांना नविन मतदान केंद्र देण्यात यावे, अशी मागणी जाम्भुळे यानी केली आहे.