जीवन वेलफेयर फाऊंडेशन तर्फे भोजनकक्षचे शुभारंभ

164
जाहिरात
Slider

तालुका प्रतिनिधि-  सिंदेवाही शहरातील शिवाजी चौक, पाथरी रोडवरती जीवन वेलफेयर फाऊंडेशन, नागपुर तर्फे भोजनकक्षचे शुभारंभ नुकतेच संपन्न झाले.

याप्रसंगी मार्गदर्शक म्हणुन मा. श्री. अनिल राउत, प्रेसिडेंन्ट जीवन वेलफेयर फाऊंडेशन, नागपुर, मा. श्री. दिलीप खोब्रागडे, व्हाईस प्रेसिडेंन्ट जीवन वेलफेयर फाऊंडेशन, नागपुर, मा. श्री. रेवनाथ वालदे, सचिव, जीवन वेलफेयर फाऊंडेशन, नागपुर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. विजयकुमार परळीकर, सचिन राउत, योगेश श्रीराम, शंकर वैद्य, विद्याधर गेडाम, रेवनाथ बरसागडे, विजय चव्हाण, निळकंठ माकडे, राजेश येळणे हे होते.

याप्रसंगी विशेष मान्यवर म्हणुन मा. अरविंदभाऊ जैसवाल, माजी सभापती पं. स. सिंदेवाही, मा. निशिकांत रामटेके, पोलिस निरीक्षक सिंदेवाही, वहाबअली सय्यद, अध्यक्ष  सिंदेवाही नगर पत्रकार संघ, भगवंत पोपटे, सचिव सिंदेवाही नगर पत्रकार संघ, खालीद पठान, प्रसिद्धी प्रमुख सिंदेवाही नगर पत्रकार संघ व इतर मान्यवर उपस्थित होते.

या भोजनकक्षात फक्त विस रूपयात जेवण मिळतो व या भोजनकक्षात भोजनाचा आस्वाद जास्तीत-जास्त लोकांनी घ्यावा असे मत भोजनकक्षचे शुभारंभदरम्यान जीवन वेलफेयर फाऊंडेशन, नागपुर चे प्रेसिडेंन्ट,  व्हाईस प्रेसिडेंन्ट, सचिव यांनी मनोगतातुन व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर वैद्य यांनी केले, संचालन सुनील टेभुर्णे तर आभार लतीफ़ फारुकी यांनी केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।