वॉटरकप स्पर्धेचा आज पुण्यात निकाल-अकोट तालुक्यातून जल मित्र रवाना

268
जाहिरात

 

अकोटः संतोष विणके-

पाणी फाऊंडेशन द्वारा आयोजित वॉटर कप स्पर्धा २०१९ तिसऱ्या पर्वाचा निकाल हा आज रोजी पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये घोषित होणार आहे. अकोट तालुक्यातुन ह्या स्पर्धेत सहभागी झालेले गावकरी हे या बक्षिसे वितरण सोहळा साठी आज रवाना झालेत. अकोट तालुक्यातुन स्पर्धे साठी 64 गाव पात्र ठरले होते त्यापैकी 35 गावांनी प्रत्त्यक्ष स्पर्धेत सहभाग घेतला होता या गावांपैकी डांगरखेड,रुधाडी,रंभापूर, जळगाव नाहाटे, जऊळका,मक्रमपुर,बोरी,अडगाव खुर्द,या गावांनी लक्षवेधी काम केलं त्यामूळ या स्पर्धेत अकोट तालुक्यातील कुठली गावं विजेते ठरतात याची उत्सुकता आता सामन्यांना लागली आहे

अकोट बस स्थानकातून शिवशाही बस ने पुणे येथील सोहळ्या साठी स्पर्धेतील गावकरींनी प्रस्थान केले ४५ डिग्री पेक्षा जास्त तापमानात श्रम दान करणाऱ्या सर्व जल मित्रांचे व गावकरींचे योगदानामुळं ही लोक चळवळ वेगळ्या उंची वर गेली आहे.अशी माहिती मंगेश निमकंडे अकोट तालुका समनवयक पाणी फाऊंडेशन यांनी या वेळी बोलताना दिली. अकोट तालुक्यात पाणी चळवळीचं कार्य मोठे प्रमाणात झाले आहे त्यामुळे राज्यस्थरावर तालुक्यातील गावं विजेती ठरतील का याची उत्सुकता आता सर्वाना आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।