सत्ताधारी भाजप शब्दांना मुकरली…

214
जाहिरात

समस्या सोडविल्या जात नसेल तर राजीनामा ध्या !
व्यंकटेश नगरातील संतप्त नागरिकांच्या प्रतिक्रिया
शेगांव (प्रतिनिधी) : गेल्या ८ दिवसापासून रस्त्यावरील पाणी गल्लीत तुंबून नागरिकांच्या घरात गेले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. समस्येची तक्रार केल्यामुळे नगराध्यक्ष पती, मुख्याधिकारी आणि न.प.चमूने भेट दिली मात्र समस्या निकाली काढली नाही त्यामुळे या व्यंकटेश नगरातील प्रभाग ८ मधील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा उचलत सरळ समस्या निकाली काढल्या जात नसेल तर आपल्या पदाचा राजीनामा द्या अशा संतप्त प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या.
पावसाचे पाणी आणि रस्त्यावरील पाणी गल्लीत साचल्याने गेल्या ८ दिवसापासून गल्लीत साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच भूमिगत गटार योजनेचे चेंबर च्या खोदकामामुळे या गल्लीत चिखल झाला आहे परिणामी या रोड वरून चालणे मुश्किल झाले आहे. याची तक्रार नागरिकांनी नगर पालिकेतही केली त्यावरून नगराध्यक्ष पती पांडुरंग बूच, नगरसेवक प्रफुल्ल ठाकरे, मुख्याधिकारी शेळके, बांधकाम अभियंता आश्रमा, भालेराव यांनी स्थळ पाहणी केली आणि नेहमीप्रमाणे पंप द्वारे पाणी काढून देतो, मुरूम टाकून देतो असे म्हणून नागरिकांना आश्वासन दिले. मात्र नेहमी प्रमाणे २४ तास उलटूनही नगर पालिके द्वारे यावर कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे आज १० ऑगष्ट रोजी संतप्त होऊन नागरिकांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून आपल्या समस्या सांगितल्या व आपला रोष व्यक्त केला.रस्त्यावरील आणि डॉ. नागरगोजे यांच्या दवाखान्या पासून आलेले साचलेले पाणी वडार यांच्या गल्लीतून काढून निर्मल नगरच्या वाहत्या मार्गाने पाणी वळती केल्यास समस्या सुटू शकते मात्र न.प.प्रशासनाने येऊन पाहून समस्या सोडविली नाही असेही यावेळी नागरिक बोलत होते. यावेळी घनश्याम बततुलवार, चौके, मुंढे, गवई, शेंगोकार,भटकर, वासनिक, घरडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
—————————————-
निवडून आल्या पासून लोकप्रतिनिधीचा पत्ता नाही
— प्रभाग ८ मधील शेवटचे टोक म्हणजे जोशी वाईडर व वासनिकांची गल्ली न.प. निवडणुका झाल्या नंतर नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रभागाच्या नगरसेवक प्रफुल ठाकरे आणि नगराध्यक्ष पतींनी या भागात प्रथम भेट दिली परंतु निवडणुकी आधी किती वेळ भेट दिली असावी कुणाचं ठाऊक फक्त मतांसाठी.. !
निवडून आल्यानंतर मात्र हम आप के है कोण परंतु सत्ताधारी पक्षाकडून आश्वासन देण्यात आले होते की आम्ही कामाची सुरुवातच याच भागापासून करून पण आज निवडून यायला अडीच वर्ष होत आहे आणि नगर सेवक नगराध्यक्ष पहिल्यांदा भेट दिली नगरसेविका सौ खानझोडे यांचा या भागात अद्यापही पत्ता नाही त्यामुळे शेवटची गल्ली म्हणून या गल्ल्या सोबत प्रभागातील नगरसेवकांनी पूर्वी पासूनच अन्याय केला असल्याचेही बोलले जात आहे. आपण यांना पाहिलत का आता अशी पोस्टर सुद्धा लावण्यात येतील
मागील वर्षी विरोधकांनी नगर परिषद समोर कामे होत नसल्या मुळे उपोषण मांडले होते. त्यात त्याच प्रभाग क्र ८ मधील राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रफुल ठाकरे, शैलेष पटोकार,खंडेराव यांनी केलेत.
आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत जनता काय करेल हे पाहणे महत्वाचे राहील.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।