सिंदेवाहीतील हॉकी खेळाडूची क्रीड़ा प्रबोधिनीसाठी निवड

142
जाहिरात

तालुका प्रतिनिधि- सिंदेवाही तालुका हॉकी असोसिएशनचे खेळाडू करण विजय वाढई व महेश ईरपा मडावी यांची क्रीड़ा प्रबोधिनी पुणे साठी निवड झाली आहे.
दि. २४ ते २६ जून २०१९ दरम्यान शिवछत्रपती क्रीड़ा पीठ अन्तर्गत सरड प्रवेश व कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली होती. या घेतलेल्या निवड चाचणीतुन हॉकी खेळाकरिता सिंदेवाहीतील दोन खेळाडूची निवड झाली आहे. यांना पुणे येथील बालेवाडी हॉकी प्रशिक्षण केन्द्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
निवड झालेल्या सिंदेवाहीतील हॉकीपटुला चंद्रपुर जिल्हा हॉकी असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, उपाध्यक्ष रमेशसिंग चव्हाण, सचिव समीरखान पठाण, तसेच सिंदेवाही तालुका हॉकी असोसिएशन चे अध्यक्ष अरविंद जैस्वाल, उपाध्यक्ष संतोष खोब्रागड़े, तालुका क्रीड़ा सयोजक हरिभाऊ पाथोडे, सदस्य लेमदेव नागलवाडे, विनायक खोब्रागड़े, दिलीप लोडेल्लीवार, सुनील सुकारे, क्रिष्णा ठीकरे, गोविंद बिसेन, शीतल डांगे, भूपेश काळे, अमोल मेश्राम यांनी खेळाडू चे कौतुक केले. खेळाडू नी यशाचे श्रेय आईवडिल सोबतच तालुका हॉकी असोसिएशंन चे सचिव व मार्गदर्शक डॉ. राहुल धारगावे, प्रशिक्षक सारंग गरमळे, निखिल मसराम ,आकाश खोब्रागड़े, यांना दिले आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।