वॉटरकप स्पर्धेत आकोट तालुक्यातुन प्रथम क्रमांकावर रुधाडी ला 10 लाखाचे बक्षीस – रंभापुर द्वितीय,तरजळगाव नहाटे तिसरे

0
1081
Google search engine
Google search engine

 

आकोटः संतोष विणके
पाणी फौंडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेचा आकोट तालुक्याचा निकाल आज पुण्यात जाहीर करण्यात आला.स्पर्धेत रुधाडी या गावाने तालुक्यातुन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार व बक्षिस पटकावला तर रंभापुर या गावाने द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार व बक्षिस तसेच जळगाव नहाटे या गावाने तृतिय क्रमांकाचा पुरस्कार व बक्षिस पटकावले. पुरस्कार सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा चे ब्रांड आंबेसिडर बॉलीवूड अभिनेते अमीर खान यांच्या हस्ते देण्यात आले. गाव पाणीदार कसे होईल या उद्देशाने ही स्पर्धा गेल्या तिन वर्षापासुन आकोट तालुक्यात घेण्यात येते आहे.यावेळी पुरस्कार प्राप्त गावांना सत्यमेव जयते पाणी फौंडेशनचे प्रमाणपत्र देण्यात आले.रुधाडी गावाला प्रथम बक्षिस 10 लाख तालुक्यातील दुसरा पुरस्कार रंभापुर या गावाला6 लक्ष रु व तिसरा पूरस्कार चे मानकरी ठरले ते जळगाव नहाटे या गावाला 4 लाख रु चेक व प्रमाणपत्र देऊन या सर्व गावचे स्वागत करण्यात आले.
या वर्षी ही स्पर्धा 8 एप्रिल ते 27 मे पर्यंत या कालावधीत 50 दिवस होती.विशेष म्हणजे यंदा लोकसभा निवडणुकांची धामधुम असतांनाही गावकरींनी मोठ्या प्रमाणावर श्रमदानात सहभाग घेतला होता. भर उन्हाळ्यात कधी दिवसा तर कधी रात्री आप आपल्या गावात श्रमदान करून गाव पाणीदार करण्यासाठी गावकरी झपाटले होते.या स्पर्धा मध्ये तालुक्यतील ६४ गावांनी सहभाग नोंदविला होता तर शेवट पर्यंत यात३५ गावांनी श्रमदान केले या मध्ये तालुक्यातुन या तीनही गावांनी जास्त श्रमदान करून आप आपले गाव पाणीदार केले म्हणून या श्रमदान चे चिझ होऊन आज पुरस्कार चे मानकरी ठरलेत ४५ डिग्री पेक्षा जास्त तापमानात विदर्भातील प्रतिकुल वातावरणात तालुका वासियांनी केलेले हे श्रमदान अभिमानास्पद ठरावे असेच आहे.