वॉटरकप स्पर्धेत नरखेड तालुक्यातुन खरसोली गावाला प्रथम पारितोषिक – पानी फाउंडेशन तर्फे १० लाख रुपये बक्षीस प्राप्त ! 

1046

 

लाखो गावकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला बक्षीस वितरण सोहळा ! 

नरखेड तालुका  प्रतिनिधी /

पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा निकाल

दिनांक ११ ऑगस्ट रोजी बालेवाडी स्टेडियम पुणे येथे मोठ्या उत्साहात

संपन्न झाला असून यामध्ये नरखेड तालुक्यातील खरसोली गावाने तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आहे तर तालुकास्तरावर दुसरा क्रमांक गोंडेगाव ने मिळवला आहे.तिसरा क्रमांक राणवाडी या गावाला प्राप्त झाला  वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा नरखेड तालुक्यातील अनेक गावांनी पाणीदार गावाकडे वाटचाल केली आहे .

नरखेड तालुक्यातील खरसोली या गावाने वॉटरकप स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून रोख १० लाखांचे पारितोषिक पटकावले असून पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवरील पारितोषिक वितरणानंतर खरसोली ग्रामस्थांनी  आनंद व्यक्‍त केला. दरम्यान,  खरसोली येथील सरपंच निलीमाताई अरसडे , नरेश अरसडे , यांच्यासह गावकऱ्यांनी पुणे येथे पाणी फाउंडेशन चे संस्थापक आमिर खान ,किरण राव  ,सत्यजित भटकळ, डॉ.अविनाश पोळ , विदर्भ समन्वयक चिन्मय फुटाणे , जिल्हा समन्वयक भूषण कडू , तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , यांच्या उपस्थितीत  ग्रामस्थांनी पारितोषिक स्वीकारले.

एप्रिल व मे महिन्यात ऐन उन्हाच्या तडाख्यात कामाचे योग्य नियोजन करून ग्रामस्थ, युवक, महिलांची मोट बांधून सलग ४५ दिवस राबून खरसोली गाव परिसरातील शिवाराचे चित्रच पालटून टाकले. पारितोषिक मिळेल अथवा न मिळेल पण गावाचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी हजारो हात एकत्रित येऊन कामाला लागले होते. त्यामुळे काम करताना अनेक अडचणी येऊनही अगदी नेटाने ग्रामस्थांनी काम पूर्ण केले. यादरम्यान सिनेअभिनेते अमिर खान, किरण राव, व  विविध सेलीब्रिटींनी  भेट देऊन ग्रामस्थांचा हुरूप वाढविला.

खरसोली येथील ग्रामस्थांनी शेततळी, सिमेंट बंधारे,  , डीप सिसिटी , वनतळे , कंपार्टमेंट बंडिंगची कामे केली तसेच खरसोली गावच्या परिसरातील क्षेत्रामध्ये यासारखी विविध कामे पूर्ण केले. यामुळे खरसोली गावामध्ये कोट्यवधी  लिटर पाणी जमा होणार आहे. याचा फायदा खरसोली गावाला मोठ्या प्रमाणात होणार आहे .

पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा आज ११ऑगस्ट रोजी पुण्यात बालेवाडी येथे वॉटर कप बक्षीस वितरण समारंभ दिमाखदार सोहळ्यात पार पडला.

स्पर्धेत नरखेड तालुक्यातील  खरसोली गावाने  वॉटर कप स्पर्धे मध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक  मिळवला त्यांना पाणी फाउंडेशन तर्फे १० लक्ष रुपयांचे बक्षीस मिळाले . तर तालुका स्तरीय नरखेड  तालुक्यातील गोंडेगाव या छोट्याशा गावाने द्वितीय क्रमांक मिळवला यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ६लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे , व तृतीय क्रमांक राणवाडी या गावाने मिळविला त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ४ लक्ष रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे , त्यावेळी पुणे येथें  आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी खरसोली, गोंडेगाव , राणवाडी , येरंडा , दातेवाडी , रामठी , उदापुर ,पिंपलदार , मालापूर , येथील शेकडो गावकरी मंडळी तसेच  मनीष केने , लीलाधर ठाकरे , अमोल बरडे , अंकित अरसडे , रोशन अरसडे , पवन आगे , रवी निंभोरकर , अशोक हिवसे , निलेश राऊत , कृषी सहाय्यक बळीराम येवले , पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक रुपेश वाळके , हेमंत पिकलमुंडे , भूषण सूर्यवंशी  यांनी पुणे येथील बालेवाडी येथे आनंदोत्सव साजरा केला .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।