आशोक जगदाळे धावले पुरग्रस्तांच्या मदतीला ; चार फिरते दवाखाने रवाना

165

उस्मानाबाद / हुकमत मुलाणी

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अशोक जगदाळे यांनी जो मदतीचा हात पुढे केला आहे तो कौतुकास्पद आसुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वानी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केले.

निसर्गाच्या तांडवनृत्याने महाराष्ट्रात गेल्या आठवड्या पासुन हां हां कार उडवला आहे आजही मराठावाडा पावसासाठी एकीकडे चातका सारखी प्रतिक्षा करीत आसताना. पश्चीम महाराष्ट्रात कोल्हापूर ,सांगली,सातारा,या जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वञ महापूर आला आहे. या मुळे संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे.हजारो हात या अस्मानी संकटानी ग्रस्त नागारीकांच्या मदतीसाठी पुढे येत असताना तुळजापूर तालुक्यातिल सदैव मदतीस धावत असनारे तालुक्याचे नेते श्री अशोक भाऊ जगदाळे हे धावुन आले आहेत. दमयंती हरीदास जगदाळे प्रतिष्ठाण’, दृष्ठी उद्योग समुह मुंबई व ओखार्ड हाँस्पीटल मुंबई यांच्या विद्यमाने पुरग्रस्त भागात नागरीकांना आरोग्य सुविधा पुरवन्या करीता .चार फिरते आरोग्य केंद्र औषधे व तज्ञ डाँक्टरांचे पथक पाठवन्यात येणार आहे. हे पथक आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरुन नागरीकांची आरोग्य तपासणी,डेग्यु ,मलेरिया,ब्लडप्रेशर,मधुमिया, व सर्व साथीच्या आजारावर तात्काळ तपासणी करुण इलाज केला जानार आहे. या सुविधा आज दि.१२/८/२०१९सोमवार रोजी सकाळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ [मुंडे] व अशोक जगदाळे यांच्या शुभहस्ते सकाळी ११वा . जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुंढे म्हणाल्या कि राज्यात महापूरामुळे नैसर्गिक आपत्ती आली आसुन उस्मानाबाद जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात मदत पाठवली जात आहे. अशोक जगदाळे यांनी पूर ग्रस्ताच्या मदतीसाठी चार आरोग्य वाहीन्या ,औषधे व डाँक्टरांचे पथक पाठवले आहे हे कार्य कौतुकास्पद आहे समाजातील दानशुर व्यक्तीनी मदतीसाठी पुढे यावे आसे आवाहन केले. अशोक जगदाळे यांनी जिल्हाधीकार्याना असे आश्वासन दिले कि पूरग्रस्त भागात मदत कोणतीही लागो मी ती तात्काळ उपलब्ध करुन देईन. या नंतर जगदाळे प्रतिष्ठाण मार्फत मोठ्या प्रमाणात मदत पाठवन्यात येणार आहे.
यावेळी ओखार्ड हाँस्पीटल चे डाँ जयकिशन गुप्ता,डाँ विकास चोबे ,डाँ आनिता राकेश ,डाँ आभिषेक मोरे, अमोल कांबळे ,शिवसेनेचे कमलाकर चव्हाण पञकार विलास येडगे ,सुधीर पोतदार ,अयुब शेख,तानाजी जाधव,महेश जळकोटे,दयानंद पाटील ,वर्धमान पाटील,कल्याण लोके,उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।