आयुष्मान भारत योजना ची शिबिर संपन्न

0
1344
Google search engine
Google search engine

सिंदेवाही ता. प्र.- तालुक्यातील पेटगाव येथील आपले सरकार सेवा केंद्र व ग्राम पंचायत यानी ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री जन आयोग्य योजना (प्रधानमंत्री आयुष्मान योजना) ची शिबिर दिनांक 11 ऑगस्ट रोजी संपन्न झाली व या शिबिरमध्ये जवळपास 45 ते 50 लाभार्थ्याची नोंद करण्यात आली.
आयुष्मान योजने अंतर्गत लाभार्थ्याला पाच लाख रुपयाचा आयोग्य विमा मिळतो व या योजनेचा कार्ड लाभर्थ्याला मिळतो याकरिता नोंदणी शुल्क 30 रुपये आहे.
आजपर्यंत 850 लाभर्थ्यांची नोंदणी आपले सरकार सेवा केंद्र येथे झालेली आहे असे दुर्मिळ रामटेके केंद्र चालक आपले सरकार सेवा केंद्र पेटगाव यांनी सांगितले.
या शिबिरदरम्यान शिंदे विस्तार अधिकारी सिंदेवाही, अरुण घाटोले आरोग्य विस्तार अधिकारी सिंदेवाही, अरुणा शेंडे ग्रामसेवक ग्रा.पं. पेटगांव, आशा मेश्राम सरपंच ग्रा.पं. पेटगांव, विनोद दांडेकर उपसरपंच ग्रा.पं. पेटगांव, अनिल चन्ने कंप्यूटर ऑपरेटर ग्रा.पं. पेटगांव, दुर्मिळ रामटेके केंद्र चालक आपले सरकार सेवा केंद्र पेटगाव, बंदिनी जगताप नर्स, रेखा गेडाम आरोग्य वर्धिनी, चित्रा मोहुर्ले आरोग्य वर्कर, अल्का डेंगे व ग्रामपंचायत चे कर्मचारि उपस्थित होते.