हर हर बोला महादेव गजराने निनादली पणज नगरी-मुस्लिम बांधवांनी केले शिवभक्तांचे स्वागत

0
637
Google search engine
Google search engine

 

कावड यात्रा व ईदच्या सणाने पणज नगरीत उत्साह

पणज(दिनेश बोचे)-

काल सोमवारी शिवभक्त मंडळातर्फे पणज नगरीत मोठ्या भक्तीभावात कवड्यात्रा काढण्यात आली.यात्रे दरम्यान भोले भक्तांसाठी ठिकठिकाणी चहा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणून शिवमंदिरात महादेवाला जलाभिषेक घालण्यात आला.दोन्ही मिरवणुकीत गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होते,मिरवणुकीच्या समारोपा नंतर प्रगतशील व्यावसायिक विजय दातीर यांच्या तर्फे शिवभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील नागोबा संस्थान मध्ये नागपंचमी उत्सवापासून विविध धार्मिक उत्सव साजरे होत असतात त्यातच नुकतीच कावड यात्रा पार पडली. नागपंचमी निमित्त नागोबा संस्थान व प्रमोद नवले यांच्या कडे ९ अॉगस्ट रोजी सकाळी महाप्रसाद पार पडला व संध्याकाळी नागोबा संस्थानची मिरवणूक काढण्यात आली,गावात ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले पालखी सोहळ्यात संत ज्ञानेश्वर हरिपाठ मंडळ व महालक्ष्मी धोलाचे भजन मंडळ च सहभाग होता.
तसेच आज बकरी ईदनिमित्त मुस्लिम समाजातील लोकांनी इ द गाह वर नमाज अदा केली व बकरी ईद साजरी केली यावेळी ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड ,महेश श्री वास,नितीन अकोटाकर, व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावला होता.