पूरग्रस्तांसाठीची मदत प्रशासनाकडे जमा करा : आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे सामाजिक संस्था, मंडळे, व्यक्तींना आवाहन : मदत निधीचा गैरवापर रोखण्याची गरज

जाहिरात

सध्या सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवाना सगळीकडून सढळ हाताने मदतीचा ओघ सुरू आहे. समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे याचेच हे प्रतीक आहे. परंतू येणारी मदत खरोखर ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहचत आहे का ? हे पाहणे महत्वाचे आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला पूरग्रस्त बांधवाना मदत करायची आहे. त्यांनी आपली मदत प्रशासनाकडे जमा करावी. असे आवाहन आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले आहे.
‌ देशमुख म्हणाले, पूरग्रस्त बांधवाना मिळणारी संपूर्ण मदत ही खरोखर पूरग्रस्त असलेल्या लोकांच्या पर्यंत पोहचत नाही अस दिसून येत आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. मदतीचा ओघ सुरूच आहे. मात्र खरेच ज्यांना मदत मिळायला पाहिजे. त्यांच्यापर्यंत ही मदत पूर्णपणे पोहचत नाही. पूरग्रस्त बांधव ज्यावेळी आपल्या घरी जातील त्यावेळी त्यांना मदतीची खरी गरज भासणार आहे. सरकारकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. घरामध्ये पूराचे पाणी गेले आहे. त्या कुटुंबाना १० हजार रूपये तातडीची मदत दिली जाणार आहे. तसेच ज्यांची घरे पडली आहेत, ज्यांची जनावरे दगावली आहेत. त्यांना ही तात्काळ मदत केली जाणार आहे. सर्व पंचनामे करण्यासाठी शासनाने प्रशासन कामाला लावले आहे.
ते म्हणाले, सरकार पूरग्रस्त बांधवाना सर्वोतोपरी मदत करणार आहे. परंतु ज्या व्यक्ती, संस्था, मंडळे अथवा समाजातील इतर दानशूर मदत करणार आहेत. त्यांनी ती प्रशासनाकडे जमा करावी म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांना ती पोहोच होईल. मदत तुमची व नाव दुसऱ्याचे असे ही काही ठिकाणी निदर्शनास येत आहे. त्यामुळे मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस, संस्थेस अथवा मंडळांना आवाहन करण्यात येत आहे. की मदत ही प्रशासनाकडे जमा करा, तरच ती मदत खऱ्या लाभार्थ्यांना पोहच करता येईल.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।