धारगड यात्रेला टूव्हिलरने जाण्याची परवानगी- प्रहारच्या मागणीला यश 

0
871
Google search engine
Google search engine

आकोट :- धारगड याञेला टुव्हिलरने जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी प्रहार वन्यजिव विभागाच्या उपवनसंरक्षक यांना केली होती प्रहार च्या ला यश आले असुन धारगड याञेला टुव्विलरने जाण्याची परवानगी वन्यजिव विभागाने दिली आहे त्यामुळे शिवभक्ता मध्ये आनंद  व्यक्त केल्या जात आहे.

प्रहार पक्षाचे जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर तसेच धारगड सेवा समिती सदस्यांनी उपवनसंरक्षक आकोट यांची भेट घेवून निवेदन दिले तसेच संविधानातील आर्टिकल 25 नुसार कुणाच्या धर्मीकतेवर बंधन आपण करू शकत नाही .तसेच 1972 साली टायगर प्रोजेक्ट तसेच नॅशनल पार्क ही संकल्पना सुद्धा नव्हती तेव्हा पासुन धारगड यात्रा सुरू आहे .तसेच N. T. C. N. L च्या निर्देशा नुसार वर्षातील 3 दिवस टायगर प्रोजेकट मधील लोकमान्यता प्राप्त मंदिरा मध्ये आपण वनविभागाच्या अधीन राहून मान्यता देवू शकतो असे स्पष्ट निर्देश असल्याचे परिपत्रक तसेच मा.उच्चन्यायालयाचा आदेशाची प्रत उपविभागीय वनसंरक्षक याना देण्यात आली तसेच आमदार बच्चु कडु यांनी उपप्रधान अपर वन संचालक मेळघाट यानाचाशी दूरध्वनी वरून संपर्क साधुन या बाबतीत चर्चा केली .चार तासाच्या बैठकी मध्ये शेवटी धारगड यात्रेस टूव्हिलरची परवानगी देण्यात आली शिष्टमंडळा मध्ये प्रहार जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ देठे .सुनील भाऊ पवार .सागर उकंडे .तुषार पाचकोर .बली राजा .अविनाश घायसुंदर .राजू ढोले. बंडू शिरसाट .पवन बांकुलवले राहुल देशमुख  अचल बेलसर .रितेश हाडोळे समीर जमदार तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्तीत होते*.