राज्यस्तरीय सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोला जिल्हा दुसर्‍या स्थानी

348

अकोटः ता.प्रतिनीधी-
महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे मान्यतेने वाशिम जिल्हा सॉफ्टबॉल संघटने द्वारा विद्या भारती महाविद्यालय, कारंजा लाड जिल्हा वाशीम येथे दिनांक ९ ते १२ आॅगस्ट २०१९ दरम्यान पार पडलेल्या २६ व्या राज्यस्तरीय सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोला जिल्हा मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
या तिन दिवसीय स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने आपल्या गटातील नागपूर जिल्हा संघाला ०४-०० होमरन फरकाने तर वाशिम जिल्हा संघाला ०४-०१ होमरनने हरवुन आपले गटातील सर्वोच्च स्थान प्राप्त केले. त्यानंतर उप उपांत्य पुर्व फेरीत अकोला महानगरपालिका संघाचा ०४-०१ होमरनने पराभव करीत पहिल्या आठ संघात प्रवेश मिळवला. उपांत्य पुर्व फेरीचा सामना नवी मुंबई चमू सोबत ०९-०२ अशा मोठ्या फरकाने जिंकून अकोला जिल्हा चमूने दमदार पणे या कारंजा च्या राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेची उपांत्य फेरी यवतमाळ सोबत ०३-०१ होमरनने विजयी होवुन पार केली व अकोला जिल्हा मुलांच्या संघाने कुमार गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली.
वर्धा जिल्हा सॉफ्टबॉल चमू सोबत झालेल्या अंतीम सामन्यात अकोला जिल्ह्याच्या सॉफ्टबॉल खेळाडूंनी चिवट प्रतिकार व चमकदार कामगिरी करून दाखविली. मात्र अनुभवाच्या आधारे वर्धा जिल्हा संघाने २-०० होमरनने विजेतेपद मिळविले.
सदर अकोला जिल्हा मुलांच्या संघात तेजस मोडोकार – कर्णधार (पिचर) , परिमल धर्मे (कॅचर) , रितेश पवार (थर्ड बेस) , साहिल गणगणे (सेकंड बेस), अभिषेक आंधळे (शॉर्ट स्टॉप), श्रेयस ओइम्बे (फर्स्ट बेस), परिमल चौखंडे (सेंटर आऊट), पार्थ झाडे (राइट आऊट), आयुष झाडे (लेफ्ट आऊट), आलोक सराफी (सेंटर आऊट), शिवम तायडे (थर्ड बेस) ( सर्व आस्की किड्स पब्लिक स्कूल, आकोट) विपुल बायवार (लेफ्ट आऊट) (विद्यांचाल द स्कुल, आकोट ) तर धर्मराज राऊत (लेफ्ट आऊट) , पार्थ केसकर (शॉर्ट स्टॉप) , ज्ञानेश राऊत (थर्ड बेस), सोहन जाधव (कॅचर), हेमंत तायडे (सेंटर आऊट), यश सुकडे (थीर्ड बेस) ( सर्व खंडेलवाल कॉन्व्हेंट, अकोला) या खेळाडूंचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून श्री सुजय कल्पेकर व श्री विकास वानखेडे यांनी काम पाहिले. चमू सहायक म्हणून राष्ट्रीय खेळाडू यश निर्वाण ने जवाबदारी सांभाळली तर संघ व्यवस्थापक म्हणून श्री सागर निळे यांनी काम पाहिले.

या विजया बद्दल डॉ. श्री प्रदीप तळवेलकर, सचिव महाराष्ट्र सॉफ्टबॉल, डॉ.श्री सुरज येवतीकर, सह सचिव महाराष्ट्र सॉफ्टबॉल, तसेच अकोला जिल्हा सचिव श्री नाजुकराव पखाले छत्रपती पुरस्कारार्थी व अकोला जिल्हा सचिव , आस्की किड्स आकोट चे अध्यक्ष श्री मिलींद झाडे, सचिव श्री नितीन झाडे व मुख्याध्यापिका सौ नेहा झाडे यांनीही खेळाडूंच्या यशा बद्दल खेळाडू व पालकांचे अभिनंदन केले आहे.

विजयी खेळाडू आकोट ला देशपांडे अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स मधे सॉफ्टबॉल खेळाचा नियमित सराव करतात. देशपांडे अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स आकोट च्या संचालिका श्रीमती मंजिरी देशपांडे व सौ. नुपुर देशपांडे यांचे सह *मानद प्रशिक्षक व भारतीय सॉफ्टबॉल महासंघाचे टेक्निकल कमिशनर श्री मुकुल देशपांडे यांनीही खेळाडूंचे या उज्ज्वल यशा बद्दल अभिनंदन केले आ

जाहिरात