*विसावा वृध्दाश्रमात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा-जेसीआय अचलपुर मेळघाट व ज्ञानगुरु कॅम्पुटरच्या पदाधिकार्यांची वृध्दाश्रमाला भेट*

0
528
Google search engine
Google search engine

परतवाडा – तालुक्यातील अचलपुर -चांदुर बाजार नाका स्थीत विसावा वृध्दाश्रमात ७३ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष, सचिव व निराधार वृध्दांच्या उपस्थीतीत सकाळी ८.३० वा. वृध्दाश्रम परिसरात मोठ्या उत्साहामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. व वृध्दांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्यदिनानिमीत्य सामाजीक क्षेत्रात अग्रणी असलेल्या जेसीआय अचलपूर मेळघाट व ज्ञानगुरू कॉम्पुटर एजुकेशन परतवाडा यांनी वृध्दाश्रमाला भेट दिली. तसेच वृद्धाश्रम मधील वृद्धांना फराळाचे वाटप करण्यात आले. जेसीआय कडुन वृध्दांना टॉनिक गोळया देण्यात आल्या. वृद्धाश्रमाला प्रथमच भेट देणारे ज्ञानगुरू कॉम्पुटर एजुकेशनचे विध्यार्थी वृद्धाश्रमात येऊन भारावून गेले. येथील वृद्धांसोबत गप्पागोष्टी करण्यात त्यांनी आपला वेळ घालविला. विद्याथ्र्यांना पाहुन वृध्दाश्रमातील वृध्दांचे देखील आनंदित झाले होते. वृध्दांनी सर्व विद्याथ्र्यांना भावी आयुष्यासाठी आशिर्वाद दिले. यावेळी जेसीआय अचलपूर मेळघाट चे अध्यक्ष दिपक सराफ, माजी अध्यक्ष सुशील श्रीवास्तव, निलेश मांडले, रवी गुप्ता सह ज्ञानगुरू बहुद्देशीय संस्था व ज्ञानगुरू कॉम्पुटर एजुकेशन सेंटर परतवाडा चे संचालक अमोल नागदिवे, बेबीताई नागदिवे, सह राखी मोहने, दिव्या मोहने, सुजाता गवई, निकिता अटाळकर,अंकिता झोंबाडे, सपना निर्गुळे, प्रगती डोरस, अपूर्वा तायडे, सपना खंडवे,कार्तिक, रोहन, अंकुश खोडे, अक्षय, गौरव इंगळे, अजय नांदणे, मो.रमीज, सोहेल हुसैन, मो.दानिश,सै.सुफियान अली, जाहेद खान आदी विद्यार्थी उपस्थित होते. विसावा वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत स्वतंत्रदिन साजरा केल्याबद्दल विसावा वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव अॅड.भाष्कर कौतिककर, अध्यक्ष पुंडलिकराव भुजाडे, सचिन वानखडे यांनी आभार मानले.