पवित्र धाग्याचा सन्मान राखत भगिनींच्या रक्षणासाठी पुढे यावे – श्री निलेश विश्वकर्मा

220
जाहिरात
शेकडो भगिनींच्या उपस्थितीत हिंगणगाव मध्ये रक्षाबंधन सण साजरा
धामणगाव रेल्वे –
      रक्षाबंधन हा सण बहिणभावाच्या स्नेह आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे. भावाने बहिणीचे सदैव संरक्षण करावे हा उदात्त हेतू या राखीच्या रेशमी धाग्याशी जुळलेेला आहे. हे नाते अधिकाधीक दृढ व्हावे व या उदात्त भावनांच्या स्मृती सदैव जागृत रहाव्यात या उद्देशाने हा रक्षाबंधन सोहळा आयोजित केला असल्याचे जय हिंद क्रिडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते निलेश विश्वकर्मा यांनी सामुहीक रक्षाबंधन सोहळा प्रसंगी १५ ऑगस्टला तालुक्यातील हिंगणगाव येथे व्यक्त केलेल्या मनोगतात सांगितले.
  धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव येथे आयोजित या सोहळ्यामध्ये जवळ ४०० बहिनींनी निलेश विश्वकर्मा यांना राखी बांधली. प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गावात रक्षाबंधन सोहळा आयोजित केल्याचे गावकऱ्यांनी म्हटले. या प्रसंगी निलेश विश्वकर्मा यांनी या भगिनींना भेटवस्तु देवून त्यांच्या अपूर्व स्नेहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश ठाकुर, जितु शेंडे, प्रदिप पातोळे, आशिष चाहांडे, चंदू लडके, आकाश पाचे, समीर उरकुडे, सम्मेक ताजणे, रवि खांडवे, स्वप्नील पवार आदींसह अनेकांनी परिश्रम घेतले.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।