तेल्हारा तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धा ऊत्साहात संपन्न.

0
533
Google search engine
Google search engine

 

तेल्हाराः ता.प्रतिनिधी-
अकोला जिल्हा परिषद व अकोला जिल्हा कार्यालय अकोला यांच्या नेतृत्वाखाली शालेय तेल्हारा तालुका स्तरीय बुध्दीबळ स्पर्धा विवेक वर्धिनी विद्यामंदिर भांबेरी येथे ऊत्साहात संपन्न झाली आहे या स्पर्धा चे कार्यक्रम चे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब कौसल हे होते तर उद्घाटक म्हणून शांतीकुमार सावरकर तालुका संयोजक, प्रदीप खुपासे, हे होते तर अतिथी म्हणून प्रा.संतोष राऊत, नितीन मंगळे, राजेंद्र कोरडे, महादेव काळे, प्रदीप राऊत, आकाश धुमाळे, विशाल जळमकार सर हजर होते तालुक्यातील माध्यमिक शाळा मधून खेळाडू उपस्थित होते. या ठिकाणी विजयी झालेली सर्व खेळाडू जिल्हा स्तरावरील स्पर्धा मध्ये तालुका प्रतिनिधित्व करणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद तळोकार सर यांनी केले आहे आणि आभार राजेश डोसे यांनी व्यक्त केले आहे.