अकोट रोटरी क्लब चा पदग्रहन सोहळा संपन्न-नंदकीशोर शेगोकार नुतन अध्यक्ष

312
जाहिरात

 

आकोटः ता.प्रतिनिधी

स्थानिक अकोट शहरात रोटरी नेत्र रुग्णालय येथे अकोट रोटरी चा पदग्रहण सोहळा संपन्न् झाला. यावेळेस मंचावर डीस्ट्रीक गव्हर्नर राजेंन्द्र् भांबरे , असिस्ट्नंट गव्हर्नर विजय गुल्हाने , रोटरी चॉरीटेबल ट्रस्ट् चे अध्यक्ष प्रभाकरराव मानकर उपस्थीत होते. हया कार्यक्रमात सर्वप्रथम मावळते अध्यक्ष अरविंद गणोरकार यांनी त्यांच्या कार्यकालाचा अवहाल विस्तृत् पणे सादर केला, त्यामध्ये त्यांनी घेतलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत वाहकांसाठी नेत्र तपासणी शिबीराच्या यशस्वीतेची प्रशंसा त्याठीकाणी उपस्थीतांनी केली.
त्यानंतर नुतन अध्यक्ष नंदकिशोर शेगोकार यांना कॉलर व गॅव्हेल देऊन पदभार हस्तांतरीत करण्यात आला.रोटरीचे सचिव महणून शिरीष पोटे यांनी पदभार संभाळला. हया वेळी नुतन अध्यक्ष्यांनी नेत्र रुग्णालयाच्या विकासा करीता संकल्प, नेत्रदान, अवयव दान, जनजागृती, वृ्क्षारोपण,वृक्षासंवर्धन, रस्ता सुरक्षा सप्ताह, जलसंधारण, प्लास्टीक निर्मुलन,गीत गायण स्पर्धा,नेत्र तपासणी शिबीर अश्या अनेक समाज उपयोगी प्रकल्प् घेण्याचा मानस नुतन अध्यक्ष्यांनी घेतला.या वर्षीपासून पाच रोटरी कम्युनिटी काॅरप म्हणजे ५० नूतन रोटरी सहकारी समावेश करणार अशी घाेषना केली.
यावेळी डीस्ट्रीक गव्हर्नर राजेंद्रजी भांबरे यांनी रोटरी नेत्र रुग्णालयाच्या उन्नती करता त्या सोबतच प्रगती करता सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दीले. त्यासोबतच हया समारंभा मध्ये सहा पॅाल हॅरीस फेलो देण्याची घोषणा करण्यात आली.हया मध्ये विजय झुनझुनवाला, सुरेश व्यवहारे, राजकुमार गांधी चंद्रकांतजी अग्रवाल, शिरीष पोटे, नंदकिशोर शेगोकार यांनी रोटरीचे डोनर म्हणुन पॅाल हॅरीस फेलो बनले.
रोटरी चॅरीटेबलचे अध्यक्ष यांनी रोटरी रुग्णालयाच्या कार्यकाळाचा अवहाल सादर करुन नुतन अध्यक्ष्यांना शुभेच्छा दिल्या. हया सभे मध्ये रोटरी चारिटेबलचे सचिव राजकुमार गांधी , अरविंद गणोरकार, संतोष इस्ताफे, उदधवराव गणगणे, शाम शर्मा, , रवि मुंडगावकर, प्रमोद लहाने, सुरेशभाई सेदाणी, , अनंतराव काळे, संजयजी बोरोडे, शाम पिंपळे, घनशाम शर्मा, दिलीप चावडा,दिपक कतोरे, शेतकरी मोटर्स कर्मचारी ,अकोट येथील गणमान्य मंडळी उपस्थीत होते. अशी माहीती अकोट रोटरीचे जनसंपर्क अधीकारी कल्पेश गुलाहे कळवितात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।