जिल्हास्तरिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अकोटच्या गणगणे विद्यालयाचे वर्चस्व-अमरावती विभागीय स्पर्धेकरिता 13  खेळाडू पात्र

0
587
Google search engine
Google search engine

आकोट:ता.प्रतीनिधी-

नुकत्याच लालबहादूर शास्त्री स्टेडियम, अकोला येथे पार पडलेल्या जिल्हास्तरिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत गणगणे विद्यालयाच्या खेळाडूंनी यश प्राप्त करून जिल्ह्यात आपले वर्चस्व कायम राखले.
या स्पर्धेत 17 वर्षे वयोगट मधून मुलांमध्ये मोहन अनंत रेखाते, करण दिनेश पाटील,मुलींमध्ये कु अनामिका भगवान वानखडे, प्रेरणा तुळशीराम गुजर, दीपाली सुधाकर ताडे,श्रावणी पुरुषोत्तम खंडारे, खुशी विनोद तायडे, तसेच 19 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये ज्योती महादेव अवंडकार, माधुरी संतोष नाठे, माहेश्वरी प्रदीप गणोरकर, सोनाली वासुदेव रेखाते तर मुलांमध्ये विशाल श्रीराम राऊत ,गौरव नंदू जाधव यांनी आपआपल्या वजन गटात उत्कृष्ट वजन उचलून अमरावती विभागीय पातळीवर वर्णी लागली.एकूण 13 खेळाडू विभागीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. विजयी खेळाडू शारीरिक शिक्षण शिक्षक निलेश झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव गणगणे ,सुमंगलाताई गणगणे,गजाननराव गणगणे,अर्चनाताई गणगणे व मुख्याध्यापक गजाननराव निमकर्डे सर आदींना दिले आहे.