भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांचा सर्पदंशाने मृत्यू

0
2027

 

आकोटः ता.प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीच्या बेटी बचाव बेटी पढाव चे अकोला जिल्हाध्यक्ष भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांना अकोलखेड येथील शेतामध्ये सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. संध्याकाळच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.त्यांना लागलीच आकोटच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र त्यांची प्रकृती नाजुक असल्याने त्यांना लगेच अकोला हलवण्यात आले.मात्र वाटेतच उपचार मिळण्याआधीच त्यांची प्राणजोत मावळली.बाळासाहेब हे भाजपचे निष्ठावान तथा प्रचंड मेहनती सच्चे कार्यकर्ता पदाधिकारी होते. भाजपच्या घर घर चलो सारख्या अभियानात त्यांनी प्रसंगी एकटे व मोजक्या कार्यकर्तासह पक्ष कार्य करुन आकोट मतदार संघात भाजपला सुगीचे दिवस आणले.याआधी ते भाजपचे जिल्हा उपाध्यक्षही होते.अकोलखेड या गावचे ते लोकनेते होते.त्यांच्या अचानक जाण्याने संपुर्ण तालुक्यात शोक लहर आली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.