सर्वोदय कन्या विद्यालयात, शालेय मंत्रिमंडळ गठीत.

207
जाहिरात

सिंदेवाही ता. प्र.: तालुक्यातील सर्वोदय कन्या विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही येथे विद्यार्थ्यांना लोकशाही शासनप्रणालीची प्रात्यक्षिकाद्वारे ओळख व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्य रुजावे,यासाठी प्रत्यक्ष गुप्त मतदान पध्दतीने शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.
यामध्ये मुख्यमंत्री म्हणून प्रियंका हटवादे,उपमुख्यमंत्री रेश्मा नागापुरे, शिक्षणमंत्री प्राची कुमरे,सांस्कृतिक मंत्री टीना गायकवाड, आरोग्य व स्वच्छता मंत्री प्रेरणा ठिकरे,क्रीडामंत्री जोत्सना लोखंडे, सहलमंत्री मेघा लोखंडे यांची निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी म्हणून अतुल केकरे,प्रा.मनोज पाकमोडे,किशोर कावळे,विनय खोब्रागडे, सलामे यांनी तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रा.संदीपान जोगी व संदिप भरडकर यांनी काम पाहिले. शाळेच्या मुख्याध्यापिका कु.संगीता यादव यांनी नवनियुक्त मंत्रिमंडळाला पद व गोपनीयतेची शपथ दिली.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।