शेतकरी, कारागिर व भूमिहीन शेतकरी यांना १ सप्टेंबर पासून निवृती वेतन अमलात आणा…. नारायण जाम्भूले

349
जाहिरात

महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, कारागिर व भूमिहीन शेतमजूर यांना दि.१ सप्टेंबर २०१९ पासून निवृती वेतन अमलात आणा, अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस नारायण जाम्भुले यांनी मा. मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातुन केली आहे.

ज्यांच्या वव्याला पंचावन्न वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शेतकरी, कारागिर व भूमिहीन मजूर यांना सामाजिक सुरक्षेच्या दॄष्टिने, प्रत्येकी दरमहा तीन हजार रुपये निवृती वेतन देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने, एल. सी.बिल नं. III , २०१७, दिनांक ३१ मार्च २०१७ ला, महाराष्ट्र शासन राजपत्र-असाधरण भाग पाच मध्ये प्रसिद्द करण्यात आले आहे.
२०१४ च्या, गडचिरोली, आरमोरी विधानसभा निवडणूक लढ़विताना, प्रसिद्द केलेल्या जाहिर नाम्यातुन,शेतकरी, कारागिर व भूमिहीन शेतमजूर यांना निवृती वेतन मिळन्यासाठी प्रयत्न करणार असे नमूद केले होते.
शेतकरी, कारागिर व भूमिहीन मजूर ज्यांची पंचावन्न वय झाल्यानंतर, वयोमानानुसार मोठे शारीरिक कष्ट करणे कठिण जाते, अशा व्यक्तिना उदरर्निवाह चालविता यावे, या सामाजिक सुरक्षेच्या जानिवेतुन निवृती वेतनाच कायद्या करण्यात आलेला आहे.
सदर राजपत्रात, अधिसूचनेद्वारे नमून देईल, अशा दिनांकास निवृती वेतन अमलात येईल असे नमूद आहे. निवृती वेतन अमलात आणन्याच्या तारखेची अधिसूचना अजुन प्रसिद्द न केल्याने, शेतकरी, कारागिर व भूमिहीन शेतकरी यांना निवृती वेतन मिलत नसल्याची बाब, मा मुखयमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातुन नारायण जाम्भुले यानी निदर्शनास आणून दिली. याकरिता त्वरित अधिसूचना प्रसिद्द करून दि.१ सप्टेंबर २०१९ पासुन शेतकरी, कारागिर व भूमिहीन मजूर यांचे करिता निवृती वेतन अमलात आणन्यात यावी, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।