सुरेश पाटलांची अखेर भाजपाला सोडचीठ्ठी

961
जाहिरात

सुरेश पाटलांची अखेर भाजपाला सोडचीठ्ठी

हुकमत मुलाणी/उस्मानाबाद

विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा मध्ये भरती होत असताना एस पी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांनी माञ मंगळवारी (दि२०)अपरिहार्य कारणामुळे भाजपाचा राजीनामा देत आहे असे सांगात पत्रकार परिषद घेवुन भाजपाला सोडचिठ्ठी देत अपक्ष निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आमदार राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वञ होत आहे. शिवाय आमदार पाटील यांचे विश्वासु कार्यकर्ते देखिल दादा भाजपा मध्ये जाऊन उस्मानाबाद कळंब विधानसभा लढवणार आहेत असे खाञीपूर्वक सांगत आहेत. यामुळे या मतदार संघातील भाजप व शिवसेना या पक्षातील इच्छुक उमेदवारांची मोठी कोंडी झाली आहे महायुतीच्या जागा वाटपात उस्मानाबाद कळंब ची जागा ही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या काही इच्छुकांनी तर प्रचाराचा श्रीगणेश केला आहे परंतु राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे या इच्छुकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्ती असलेले एस पी शुगरचे चेअरमन भाजपा नेते सुरेश पाटील हे देखिल शिवसेनेच्या जागेवर निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत त्यादृष्टीने चेअरमन पाटील यांनी मतदारसंघामधील शंभर गावात भाजप सदस्य नोंदणीच्या माध्यमातुन स्वतःच्या यांञणेचा वापर करुन बैठका घेतल्या व एक प्रचार फेरीच पुर्ण केली आहे मतदार संघात देखिल राणाजगजितसिंह पाटील यांच्या तुलनेत ‘तगडा’ उमेदवार म्हणुन चेअरमन सुरेश पाटील यांच्याच नावाची चर्चा केली जाते सुरेश पाटील हे भाजपा चे आसले तरी खासदार ओमराजे निंबाळकर व पालकमंञी तानाजी सावंत यांच्याशी असलेले त्यांचे संबध पाहता शिवसेनेमध्ये उमेदवारी बाबतीत त्यांचा प्राधान्याने विचार केला जात होता. शिवाय खासदार ओमराजे निंबाळर यांच्या प्रमाणेच चेअरमन सुरेश पाटील हे देखील आमदार पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणुन सर्वञ परीचीत आहेत त्यामुळे शिवसैनिकात देखिल त्याच्या उमेदवारीला पसंती होती
माञ आमदार पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने भाजपमधील काही मंडळीसह खासदार ओमराजे व चेअरमन सुरेश पाटील यांची मोठी कोंडी झाली आहे संपुर्ण राजकीय कारकिर्दीत कट्टर विरोधक म्हणुन ज्यांच्या कार्यशैलीवर टीका केली व आता त्यांचा प्रचार करायचा का आसा प्रश्न या मंडळीसमोर उभा राहीला आहे यामध्ये,सुरेश पाटील यांनी आमदार राणा पाटील यांच्या भाजप प्रवेशाला उघड उघड विरोध करुन राणा पाटील,ज्या दिवशी भाजप प्रेवश करतील त्या दिवशी आपण भाजप सोडु आशी भूमिका घेऊन कुठल्याही परस्थिमध्ये राणा पाटील विरुद्ध निवडणुक लढवणारच आसे संकेत दिले होते. चेअरमन पाटील यांच्या भूमिकेमुळे राणा पाटील यांच्या समोर मोठ्या आडचणी निर्माण होणार असुन सर्वसामान्य जनेमध्ये आसलेली सुरेश पाटलांची प्रतिमा व श्री पाटील यांनी तेरणा कारखाना चालु व्हावा म्हणुन उस्मानाबाद येथे काढलेला मोर्चा शंभू महादेव कारखान्याकडे शेतकऱ्यांचा थकलेले १० कोटी रुपये मिळवुन देण्यासाठी कळंब येथे काढलेला शेतकरी मोर्चा व येडशी ढोकी तेर कसबेतडवळे या चार गावातील ७० हजार लोकांचा असलेला पाणी प्रश्न मिटवण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे त्याची मतदार संघात एक आगळी वेगळी ओळख निर्माण झाली आसुन आहे सुरेश पाटील यांच्या रुपात राणा पाटील यांच्या समोर,मोठे आहवान उभा राहु शकते.चेअरमन पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढवायचीच असल्याने पाटील यांनी मंगळवारी भाजपाला सोडचिठ्ठी देवुन अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।