*म.रा.शिक्षक समिती अकोट शहर शाखेची स्थापना*

0
1070
Google search engine
Google search engine

अकोट:-
अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर परिषद म्हणून ओळख असणारी अकोट नगर परिषद येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीची शहर शाखा स्थापन करण्यात आली. मराठी व उर्दू माध्यमाचे ९३ शिक्षकांपैकी ८० शिक्षकांनी दि. १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीत समारंभपूर्वक जाहीर प्रवेश केला.

अकोट शहर शाखा शुभारंभ व पदग्रहण सोहळ्याला जिल्हा प्रतिनिधी म्हणून जिल्हा कार्यकारणीतील मारोती वरोकार, राजेश देशमुख, निवृत्ती राऊत, अनिल पिंपळे, विनोद वसो, प्रमोद पिंप्राळे, रवींद्र सोळंके तसेच तालुका कार्यकारणीतील अमोल आगे, अजय अस्वार, शिवशंकर खंडेराय, अजय मावदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

*रितेश निलेवार यांची अध्यक्षपदी निवड*
या कार्यक्रमात शहर शाखेची कार्यकारणी जाहीर करण्यात शहर अध्यक्ष म्हणून रितेश निलेवार, सचिव अमानखा सलामखा, कार्याध्यक्ष जाहिरोद्दिन गयासोद्दिन, उपाध्यक्ष मो.फैजुल हक्क मो.हारूण, नरेंद्रकुमार राठौर, महिला प्रतिनिधी नाजेमाखातून मुर्तुजाखान, कोषाध्यक्ष मो. खान फिरोज, सह कोषाध्यक्ष सलीम शाह कदीर शाह, शाखा संघटक असलमखान मुर्तुजाखान, चंद्रकांत घुगे, कार्यालयीन चिटणीस असिफ शाह अजीज शाह, संपर्क प्रमुख असीम अहमद, भूषण नाथे, प्रसिद्ध प्रमुख महेंद्र राऊत, मो.शाकीर मो.राजीक, मार्गदर्शक अफजल हुसेन फरोग हुसेन, राजेंद्र लांडे, सुधीर कांबे, कलीमोद्दिन रफियोद्दिन, राजेश हंबर्डे, अ.आरिफ अ.रसूल, कार्यकारणी सदस्य मोहिबुर रहेमान, अकिल बशीर, शरद भगत, मन्साराम खोटे, नजमुल हुद्दा, अनिल कुरई, अ.सादिक, शाईस्ता अंजुम, सिद्दिक असीम, शगुफ्ता परवीन, कायदेविषयक सल्लागार अनुपम शर्मा, शोएब अहमदखान यांची निवड करण्यात आली.
नगरपरिषद शिक्षकांचे न्याय व हक्कासाठी शिक्षक समिती सजगतेने कार्य करणार असून नगरपरिषद शाळांची शै.गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना यथोचित मार्गदर्शन व सहकार्य करण्याची भूमिका देखिल आम्ही पार पाडणार असल्याची प्रतिक्रिया समितीचे नवनियुक्त अध्यक्ष रितेश निलेवार यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री मारोती वरोकार सर जिल्हा सचिव श्री राजेश देशमुख सर व तालुकाध्यक्ष श्री अमोल आगे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शहर शाखेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून शिक्षकांचे प्रश्न सोडविऱ्याची ग्वाही दिली .
याप्रसंगी शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.