*धामणगाव रेल्वे – ब्रेकींग -येेथील नायब तहसीलदाराला 5 हजारांची लाच घेतांना रंगेहात अटक*

6427
जाहिरात

 

*धामणगाव रेल्वे –

गौण खनिज/मुरुम इत्यादी वाहतूक करताना त्यांचेवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी धामणगाव रेल्वेचे नायब तहसीलदार आरोपी किसन गणपत सुर्यवंशी, वय 54 वर्ष यांनी 10,000/- रू लाचेची मागणी केली तसेच पहिला टप्पा 5,000/- रु स्वीकारण्याचे मान्य केले व 5,000/-₹ स्वतःचे राहते घरी स्विकारतांना किसन सुर्यंवशी यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज 22 ऑगस्ट रोजी सुर्यवंशी यांच्या राठीनगर, धामणगाव रेल्वे येथील घरी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावतीने केली. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक श्री.गजानन पडघन, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती, पोलीस उप अधीक्षक श्री गजानन पडघन, म पो हवा माधुरी साबळे, नापोशि सुनील वऱ्हाडे , पोशि अभय वाघ, पोशि महेंद्र साखरे व चालक, नापोशि चंद्रकांत जनबंधु आदींचा समावेश होता.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।