प्रधानमंत्री किसान मानधन योजने विषयी तहसीलदार पाठक यांची मार्गदर्शन सभा संपन्न

0
597
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- प्रधानमंत्री किसान मानधन योजने विषयी तहसीलदार अमोल पाठक यांनी सिंदेवाही तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची मार्गदर्शन सभा दि. (२२) ला तहसील कार्यालयात संपन्न झाली.
सिंदेवाही तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांची प्रधानमंत्री किसान मानधन योजना विषयी मार्गदर्शन सभा तहसील कार्यालय सिंदेवाही येथे ठेवण्यात आली होती. या सभेत तहसीलदार पाठक यांनी योजनेबद्धल सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना मार्गदशन केले व प्रधानमंत्री किसान मानधन योजनेची शिबीर घेण्याकरीता सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांना सांगितले.
अल्प व अत्यल्प शेतक-यांना त्यांच्या वृद्धापकाळात चांगल्या आरोग्यासह आनंदी जीवन जगता यावे याकरिता त्यांना आर्थिक मदत व्हावी या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत सर्व पात्र अल्प व अत्यल्प शेतक-यांना दरमहा तीन हजार रुपये पेंशन मिळणार आहे याचा लाभ मोठ्या संख्येने सिंदेवाही तालुक्यातील व्हावा असे आहवान तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी अमोल पाठक यांनी या सभेत केले.
या सभेत तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.