*एकविरा स्कूल च्या चिमुकल्यांनी कोल्हापूर पूरग्रस्तानकरिता जमविले चक्क एक लाख तीन हजार रुपये*

136
जाहिरात

दर्यापूर :-
स्थानिक एकविरा स्कूल ऑफ ब्रिलिएन्ट्स, दर्यापूर तर्फे दि. १६/०८/२०१९ ला दर्यापूर मधून मदत रेली काढण्यात आली होती रॅली ची सुरवात गोरक्षण चौकातून डॉ .राजेन्द्रजी भट्टड सर (अध्यक्ष),सौ. प्रियंका आंबेकर (एस.डी.ओ.), श्री.अमोल कुंभार (तहसीलदार) , सौ.पूनम पनपालिया (सह-सचिव) , श्री.तुषार चव्हाण (प्राचार्य) एकविरा स्कूल, श्री. राजेंद्र तटस्कर(उप-प्राचार्य) यांनी हिरवी झेंडी दाखवून केली.
सदर रॅली विद्यार्थ्यांची पूरग्रस्तानकरिता मदतीची चाललेली तळमळ बघून दर्यापूर वासियांनी भरभरून प्रतिसाद दिला व पालक, विद्यार्थी, स्कूल शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळेचे संचालक मंडळ, इत्यादी  मिळून १,०३,०००/- जमवले. सदर रेली मध्ये संस्थेचे अध्यक्ष डॉ.भट्टड, उपाध्यक्ष डॉ. भारंबे, सचिव श्री.पखान, सह-सचिव सौ.पनपालिया , सदस्य श्री. मेघे ,प्राचार्य श्री. चव्हाण , गोदावरी ग्रुपचे कर्मचारी, पत्रकार बंधू, विविध विभागाचे अधिकारी, प्रतिष्टीत नागरिक, न.प. कर्मचारी, पालक इत्यादी उपस्थित होते.

सदर धनादेश आज दि. २२/०८/२०१९ ला जिल्हाधिकारी मा. श्री.शैलेश नवल, उपजिल्हाधिकारी मा. डॉ.नितीन व्यवहारे , तहसीलदार मा. श्री. अमोल कुंभार यांना जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे डॉ. राजेंद्र भट्टड, डॉ. उत्कर्ष भट्टड व प्राचार्य तुषार चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेवून केलेल्या कार्याचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।