कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चोरीच्या घटनेत वाढ; शेतकऱ्याची बाजार समितीत तक्रार: 10 दिवसानंतर गुन्ह्याची नोंद

0
1045
Google search engine
Google search engine

 

बादल डकरे / चांदुर बाजार-

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडत्याच्या माला मधून धान्य चोरीच्या घटना दिनांक 12 ऑगस्ट ला घटली. तर आज 10 व्या दिवसाच्या कालावधी गुन्हा दाखल करण्यात आला .त्यामुळे प्रशासन च्या दिरंगाई बाबत अनेक प्रश्न चिन्ह उभे होत आहे.या धान्य चोरीच्या बाबत शेतकरी यांनी आपली तक्रार बाजार समिती कडे दिली असताना पुढील कार्यवाही का थांबली होती. या सर्व गोष्टीमुळे प्रकरण अनेक वळण घेत आहे.या धान्य चोरी करणारे हे सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये स्पस्ट दिसले आणि सदर धान्य चोरी करणारे हे बाजार समिती मधील एका संचालकांचा जवळील असल्याने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा विरोधी संचालका तर्फे केली जात आहे.
१२ ऑगस्ट ला बाजार समिती परिसरातून एका अडत्याच्या मालातून काही तुरीचे कट्टे चोरी गेल्याची घटना घडली होती. याबाबत शेतकरी व अडत्याने बाजार समिती प्रशासनाला लेखी तक्रार दिली होती. तर सातत्याने बाजार समिती परिसरात धान्य चोरी होत असलेल्या घडत होत्या. त्यामुळे आता शेतकरी यांचे धान्य बाजार समिती मध्ये असुरक्षित असल्याचे वाढत असलेल्या चोरीच्या प्रकरणावरून दिसत आहे.
त्यानुसार संचालकांनी १३ ऑगस्ट रोजी परिसरात लागलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले. यामध्ये एका अडत्याच्या माला मधून खराला येथील दोन इसम तुरीचा कट्टा नेत असल्याचे आढळून आले. मात्र सदर चोरटे हे एका सत्तारूढ संचालकाच्या जवळचे असल्याने या प्रकरणावर काही संचालकांनी मिळून पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला. तर बाजार समितीत गेल्या महिन्याभरात चोरी गेलेल्या मालाची पडताळणी करून नुकसान झालेल्या रकमेचा चोरट्यांकडून वसुली करण्याचा अजब निर्णय घेण्यात आला. या प्रकरणबाबत चोरट्याना ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली व प्रकरण दाबण्यात आले. असल्याची चर्चा सध्या तालुक्यात आहे मात्र आपले पितळ उघडे पडले असल्याने स्पस्ट सांगायला कोणीच तयार नाही.
12 ऑगस्ट च्या शेतकरी यांच्या चोरीची तक्रार मात्र बाजार समिती सचिव मनीष भारंबे यांना अखेर १९ ऑगस्ट रोजी चांदुर बाजार पोलिस स्टेशन मध्ये लेखी तक्रार दिली. या बाबत अध्यपही आज 10 दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.

यापूर्वी ही अनेकदा शेतकऱ्यांचा व अडत्यांचा माल चोरी गेला होता. मात्र बाजारसमिती तिल लावण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. तर काही निकृष्ठ दर्जाचे असल्याने चोरी गेलेल्या मालाचा सुगावा लागला नाही.

 

शेतकरी गणेश तायडे यांच्या धान्य चोरीच्या तक्रार वरून आणि सीसीटीव्ही च्या पाहून चोरीच्या घटनेची तक्रार मी काल स्वतः पोलीस स्टेशन ला दिली आहे.
सचिव -मनीष भारबे, कृषी उत्पन्न बाजार समिती

 

बाजार समिती सचिव यांच्या दिनांक 19 ऑगस्ट च्या तक्रार वरून आज चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

ठाणेदार श्री उदयसिग साळूके चांदुर बाजार