२० वर्षीय नराधमाचा तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न >< युवकांनी चिमुकलीला सोडविले आरोपीच्या चंगुलमधुन

0
1168
Google search engine
Google search engine

खडकपुरा शेतशिवारातील घटना

आरोपीला अटक

चांदूर रेल्वे – शहजाद खान – 

    २० वर्षीय नराधमाने तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला असुन चिमुकलीची काही युवकांनी आरोपीच्या तावडीतुन सुटका केल्याची घटना गुरूवारी (ता. २२) सकाळी ११.३० वाजता खडकपुरा ते चांदूरवाडी पांधन रस्त्यावरील जैन यांच्या शेतातील धुऱ्याजवळ घडली. किरण राजेंद्र वऱ्हाडे (२०) रा. कळमजापुर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

      प्राप्तमाहितीनुसार, चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमजापुर गा गावातील पीडित चिमुकली असून ती आपल्या आई वडिलांसह गुरूवारी सकाळी चांदूर रेल्वे शहरात आली होती. यावेळी गावातीलच आरोपी किरण वऱ्हाडे हा दुचाकी घेऊन शहरात आला असता तेव्हा जुना मोटार स्टँड येथे पीडीत मुलगी तिच्या आईसह दिसली. यावेळी आरोपीने येथे उभे का आहे ? याबाबत चौकशी केली असता तेव्हा पती कुठेतरी गेले असून आम्ही त्यांची वाट पाहत आहो असे मुलीच्या आईने त्याला सांगितले. त्यानंतर आपण त्यांना शोधून आणतो असे सांगत आरोपीने पीडित मुलीला गाडीवर बसवून थेट खडकपुरा ते चांदूरवाडी पांधन रस्त्यावरील घटनास्थळी गेला. तेथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथून चाललेल्या तीन युवकांना मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन बघितले असता त्यांनी असा प्रकार करतांना आरोपीला रंगेहात पकडले. त्यावर आरोपीने त्यांच्यावर विळा मारला व मुलीला घेऊन निघून गेला. त्यानंतर मुलीला आईजवळ देऊन काहीच घडले नाही असा बनाव करीत गावात निघून गेला. परंतु या घटनेचे वृत्त संपुर्ण चांदुर रेल्वे मध्ये पसरताच काहींनी त्या नराधमास त्याच्या गावात जाऊन पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर ठाणेदार संतोष भंडारे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. व त्यानंतर आरोपी किरण वऱ्हाडे याला अटक करून त्याच्याविरूध्द कलम ३५४, ३७६ (ए) (बी) भादंवी सह पोस्को अॅक्ट ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे पोलीस स्टेशनसमोर एकच गर्दी उसळली होती. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय निशांत फुलेकर करीत आहे.