*जल ही जीवन है! गो ग्रीन – से नो टू प्लास्टिक या संकल्पनेवरील चित्रकला स्पर्धेचे अमरावतीत आयोजन* *विद्यार्थ्यांसाठी क्रांती नवनिर्मिती संघटन चा अभिनव उपक्रम*

जाहिरात

 

*जल ही जीवन है! गो ग्रीन – से नो टू प्लास्टिक या संकल्पनेवरील चित्रकला स्पर्धेचे अमरावतीत आयोजन*

*विद्यार्थ्यांसाठी क्रांती नवनिर्मिती संघटन चा अभिनव उपक्रम*

अमरावती : *जल ही जीवन है! गो ग्रीन – से नो टू प्लास्टिक* संकल्पने अंतर्गत खास सुपारीच्या झाडापासून तयार झालेल्या प्लेट्स वर अभिनव चित्रकला स्पर्धा संघर्ष संस्था अंतर्गत क्रांती नवनिर्मिती संघटन तर्फे आणि नटराज निकेतन संस्था, विजडम बालजगत,विदर्भ कलाध्यापक संघ यांचे सहकार्याने २५ ऑगस्ट २०१९ रोजी शिवाजी बहुउद्देशीय माध्यमिक शाळा मुख्य शाखा,शिवाजी नगर पंचवटी चौक,अमरावती येथे आयोजित करण्यात येत आहे.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे चित्र रेखाटण्यासाठी सुपारीच्या झाडापासून तयार केलेल्या प्लेट्सचा वापर करण्यात येणार आहे. या स्पर्धेमागिल उद्दिष्ट म्हणजे प्लास्टिकला असलेला पर्याय सगळ्यांसमोर यावा हा आहे. स्पर्धेचे विशेष इयत्ता ३ री ते १० वी पर्यंत असणार आहे.
स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी झालेल्या स्पर्धामधील उत्कृष्ट चित्रांच्या प्रदर्शनांचे आयोजन होणार असल्याने या स्पर्धेला एक वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.

*प्लास्टिक चा वापर टाळणे.* *प्लॅस्टिकला उपलब्ध पर्याय सर्वांसमोर यावा.* हे या अभिनव उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रुपवर्गवारी विषय ज्यामध्ये ग्रुप A – वर्ग ३ री ते वर्ग ७ वी पर्यंत – विषय : जल वाचवा , ग्रुप B – वर्ग ८ वी ते वर्ग १० वी पर्यंत – विषय: जल वाचवा, ग्रुप C – वय ७ ते १६ वर्षे पर्यंत – विषय: निसर्ग चित्र /जल वाचवा, ग्रुप D – इतर सर्व स्पर्धकांसाठी – टीम वर्क. सहभाग शुल्क : केवळ १० रु. ठेवण्यात आले आहे. स्पर्धा : रविवार २५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेमध्ये होणार असून समारोपीय सत्रामध्ये सहभागी स्पर्धकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करन्यात आले आहे, वैयक्तिक नोंदणी साठी संघर्ष संस्था : क्रांती नवनिर्मिती संघटन, महात्मा फुले नगर, नवसारी, अमरावती 9763385428,8411854734 येथे संपर्क करावा असे आवाहन स्पर्धा संयोजिका सौ हर्षा सगणे-धर्माळे यांनी केले आहे

 

आपला विश्वासू,

भूषण इंगळे : मीडिया प्रभारी
क्रांती नवनिर्मिती संघटन

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।