हरवलेल्या मोबाईल चा बाळापूर पोलिसांनी लावला 24 तासात शोध

235
जाहिरात

अकोलाः प्रतिनिधी

नविन मोबाईल घरी घेउन जाणाऱ्या व्यक्तीचा हरवलेला मोबाईल लावला 24 तासात शोध बाळापूर पोलिसांनी शोधुन काढत आपल्या तत्पर सेवेचा परीचय दिला.पोलीस सुत्रानुसार
दिनांक 22।8।19 रोजी तक्रारकर्ते श्याम प्रकाश मुंढे रा पारस ह्यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथे लेखी तक्रार दिली की त्यांनी अकोला येथे रेड मी ह्या कंपनीचा नवीन मोबाइल 12000 रुपया मध्ये खरेदी केला व मोबाईल घेऊन ते गावी परत येत असतांना पारस जवळील रेल्वे क्रॉसिंग जवळ मोबाइल खिशातून पडला, मोबाइल पडल्याचे नंतर लक्षात आले, परंतु परत येऊन पाहिले असता मोबाईल दिसून आला नाही म्हणून चौकशी केली असता कोणीतरी मोटारसायकल वाल्याने मोबाइलला उचलून नेल्याचे सांगितले, त्याने पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली, पोलिस निरीक्षक ह्यांनी हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण डांगे, कॉन्स्टेबल देवानंद कायंदे ह्यांनी चौकशी केली असता त्यांना मोटारसायकल क्रमांक मिळाला, त्या वरून पुढे शोध घेतला असता तांदली पोलिस स्टेशन चांनी येथे राहणारे नागेश नामदेव इंगळे ह्यांची गाडी असल्याचे निष्पन्न झाले, त्याचा मोबाईल क्र मिळवून पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी मोबाइल सापडल्याचे कबूल करून त्यात सिम नसल्याने परत करू शकलो नसल्याचे सांगितले, बाळापूर पोलिसांच्या प्रयत्नाने 12000 रुपयांचा नवीन मोबाइल परत मिळाल्याने तक्रार कर्त्याने आभार व्यक्त केले।

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।