फ्रीडम इंग्लिश स्कूलमध्ये कोन बनेगा गोपालकृष्ण स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद

0
502
Google search engine
Google search engine

आकोट: स्थानिक गजानन नगर येथील फ्रीडम इंग्लिश स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून कोण बनेगा गोपालकृष्ण वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेला शाळेतील लहान बाल गोपालांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे कुंकूम तिलक व हारार्पणाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे ,मुख्याध्यापक कु. चोरोडे, कु.करुले,प्रकल्प प्रमुख महल्ले मॅडम यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेत एकूण 87 स्पर्धक सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून सौ भावनाताई चंदन ,सौ अनुराधाताई मोरे, सौ कोरपडेताई यांनी भूमिका बजावली.
कार्यक्रमाचे संचालन कु. खंडार मॅडम प्रास्ताविक कु.महल्ले मॅडम तर आभारप्रदर्शन कु.अपाले मॅडम यांनी केले. यावेळी पालकांनी उपक्रमाचे कौतुक करून उस्फूर्त प्रतिसाद दिला.