धंनूलाल पहेलवान गोपीचंद सुंडेवाले यांच निधन- अकोट कुस्ती क्षेत्राचा कोहिनूर हरपला

315
जाहिरात

आकोटः प्रतिनिधी-

अकोट कुस्ती क्षेत्राचा कोहिनूर धंन्नुलाल पहेलवान गोपीचंद सुंडेवाले यांचे शुक्रवारी निधन झाले. हनुमान आखाडा क्रमांक २ चे माजी प्रमुख , एक दिग्गज पहेलवान नगरपालिका अकोट येथे नोकरीत असलेले धंन्नुलाल पहेलवान गोपीचंद सुंडेवाले यांचे शुक्रवारी दि.२३ ला दुपारी ४ वाजता निधन झाले. धंन्नुलाल पहेलवान हे आपल्या जीवनात अनेक राज्यस्तरीय पदक प्राप्त करणारे खेळाडू होते. कुस्ती क्षेत्रात धंन्नु पहेलवान यांनी वस्ताद रुपी सुद्धा अनेक देणग्या अकोट कुस्ती क्षेत्रास दिल्या आहेत
नवीन तांत्रिक कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण करून त्यांचे मनोबल उंचावले होते , पै.सुनिल देठे , पै.विरु बरेठीया ,पै.मोहन कपले ,पै. दिनेश कडपे व शालेय कुस्ती स्पर्धेत धंन्नु पहेलवान यांनी पै.कन्हैया मुराई ,पै.निलेश देठे व पै.सुजय कल्पेकर यांना प्रशिक्षण दिले होते.
धन्नु पहेलवान यांच्या मागे पत्नी, दोन मुले ,आणि एक भाऊ व मोठा आप्त परिवार आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।