कावड यात्रेचा आकोटात अभुतपुर्व जल्लोष – विविध देखाव्यांसह भव्यदिव्य कावड व पालखी यात्रा…

0
793
Google search engine
Google search engine

 

अकोटः संतोष विणके- 

शहरातील श्रावण महीन्यातील शेवटच्या सोमवारी निघणारी भव्य कावड यात्रा काल उत्साहात पार पडली.यावेळी कावड यात्रेचा जल्लौषाने संपुर्ण शहर भक्तीरसात न्हाऊन निघाले.

शहरातील पुरातन तपेश्वरी मंदीरातील शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी शेवटच्या श्रावण सोमवारी विविध कावड मंडळ व शिवभक्त हे कावड यात्रा मिरवणुक काढतात.आकोट शहरातील कावड यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे.काल पार पडलेल्या कावड यात्रा मिरवणुकीत जवळपास २५ च्या आसपास कावड मंडळांनी सहभाग घेतला होता.

आज सकाळी गांधीग्राम येथिल जल घेऊन सकाळी कावडधारी शहरात दाखल झाले.सकाळी ८ वा.अकोला नाका येथुन कावड यात्रा मिरवणुकीला सुरवात झाली.मिरवणुक शिवाजी चौक.,सोनु चौक यात्रा चौक मार्गे सोमवार वेस मोठे बारगण शौकतअली चौक जयस्तंभ चौक मार्गे जाऊन सर्व कावड मंडळं तपेश्वरी मंदीरात पोहचली.यावेळी मिरवणूक मार्गावर ठीकठीकाणी अनेक सेवाभावी मंडळं राजकीय व्यक्ती संस्था संघटनांच्या वतीने फराळ वाटप चहा नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

मिरवणुकीत यंदा अनेक भव्यदिव्य देखावे करण्यात आले.विशेष म्हणजे यावेळी कश्मिर मुद्यासह कलम 370 वर देखावे सादर करण्यात आले होते..मिरवणूक मार्गावर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

चौकटः

मिरवणुक मार्गाच्या दुरवस्थेने कावडधारींचे हाल

शहरातील कावड मिरवणुक मार्गावर अनेक ठीकाणी खड्डे पडलेले असल्याने कावडधारींचे भर पावसात हाल झालेत मिरवणुक मार्गावरील रामटेक पुरा ते शौकतअली चौक मार्गावरील रस्त्यावर मुरममिश्रीत पिवळी मातीमुळे प्रचंड गाटा व चिखल झाल्याने मिरवणुक मार्गावरुन चालनेही कठीण झाले होते.कावडधारींमध्ये रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चांगलाच रोष असल्याचे दिसुन आले.