सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामी करण्यासाठीच समाजकंटकांचे षडयंत्र

0
748
Google search engine
Google search engine

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची बदनामी करण्यासाठीच समाजकंटकांचे षडयंत्र

चौकशी अहवालात हॉस्पिटल्स व्यवस्थापन निर्दोष; तरीही उपोषणाचा घाट!

समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या वतीने गोरगरीब, गरजू रुग्णांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध आरोग्य योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत आहे. आतापर्यंत हजारो रुग्णांनी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतलेले आहेत. शासनाच्या योजनेतील निकषानुसार पात्र रुग्णांवर वैद्यकीय सेवा आणि उपचार हॉस्पिटलमध्ये केले जातात. याबाबत कोणाचीही तक्रार नसताना काही समाजकंटक वैयक्तिक आकसापोटी आणि केवळ आर्थिक स्वार्थ साधण्याच्या हेतूने सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची नाहक बदनामी करत आहेत. त्यामुळे समाजकंटकांचे हे कुटील षडयंत्र लक्षात घेऊन सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्सची बदनामी थांबविण्यासाठी अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स व्यवस्थापनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना नोव्हेंबर 2015 पासून कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत 9284 गरजू रुणांना लाभ मिळालेला आहे. उस्मानाबाद जिल्हा हा दुष्काळग्रस्त असून केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या निकषानुसार मागास जिल्ह्यांच्या यादीत तिसर्‍या स्थानी आहे. त्यामुळे येथील गोरगरीब गरजू रूग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा मोठा आधार आहे. सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स अशा शासकीय आरोग्य योजना गरजू रूग्णांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमार्फत वेळोवेळी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे घेऊन गरजू रूग्णांना आरोग्यसेवा देण्याचे काम कोणतीही अपेक्षा न करता करण्यात येते. परंतु काही समाजकंटकांकडून केवळ आर्थिक लूट करण्याच्या हेतुने व आकसापोटी हॉस्पिटल व्यवस्थापनाची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या व्यक्तींच्या नावे तक्रारी करून नाहक बदनामी करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी हॉस्पिटल व्यवस्थापनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे. 21 ऑगस्ट 2019 रोजी श्रीराम (रणधीर) मारूती इंगळे व मनोज मनोहर शिनगारे (दोघे रा. उस्मानाबाद) यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाबाबत खोट्या तक्रारी करून हॉस्पिटल प्रशासनाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून जिल्हा शासकीय रूग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी आणि एम.डी. इंडिया कार्यालयाचे जिल्हाप्रमुख यांनी दोघांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून रीतसर अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे सादर केलेला आहे. वास्तविक शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शासननिर्देशित 971 आजारांवर नियमाप्रमाणे मोफत उपचार होतात. योजनेत समाविष्ट नसणार्‍या आजारांवर खाजगी उपचार घ्यावे लागतात. परंतु वैयक्तिक आकस आणि आर्थिक स्वार्थासाठी तक्रारदार उपोषण करून हॉस्पिटल्स व्यवस्थापनाची बदनामी करत आहेत. त्यामुळे संबंधित समाजकंटकांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी हॉस्पिटल्स प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.