दारूड्यांची दारूची तृष्णा भागविण्यासाठी तयारीत असलेल्या गावठी दारू गाळणार्‍यांच्या मनसुब्यावर सिंदेवाही पोलीसांनी फेरले पाणी.

176
जाहिरात

तालुका प्रतिनिधि – सिंदेवाही पोलीस स्टेशनचे हद्दीत पोळा, पाळवा मारभत व गणेश उत्सवात दारूचे आंबट शौकीन  दारू पिऊन आपल्या देहाचे प्रदर्शन करून सुज्ञ नागरिकांना दारूड्यांच्या होणाऱ्या त्रासापासून दुर ठेवण्यासाठी सिंदेवाही पोलीस स्टेशन व नवरगाव पोलीस चौकीचे अधिकारी, कर्मचारी यांनी दिनांक – २८/८/२०१९ ला दारूविरोधी धडक मोहीम राबवत अवैध दारू गाळणारे व विक्रेते यांना जबर धडक दिल्याने तालुक्यातील वासेरा, शिवणी, शिरकाळा, नवरगाव, सरडपार (गोपालपूरी) येथील तलावाशेजारी व नदिशेजारी मोहा दारू गाळणार्‍यांनी केलेली तयारी, त्यासाठी लागणारी सामग्री यामध्ये मातीचे मोठमोठे मडके, प्लास्टिक ड्रम, व लोखंडी ड्रममध्ये जमिनीत मोठ्या प्रमाणावर पुरून ठेवलेला मोहसडवा पोलिसांनी नाश करून दारू गाळणार्‍यांच्या मनसुब्यावर सिंदेवाही पोलीसांनी पाणी फेरले. तसेच गावठी मोहा दारू आणि त्यासाठी लागणारे रसायन आदि साहित्य ठिकाणाहून जप्त करण्यात आले असुन, मिळ्यालेल्या अधिकृत माहितीनुसार ९ लोकांवर कलम ६५ ई व ६५ फ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १७ लाख रुपये पर्यंतचा गावठी मोहा सडवा, गावठी दारू गाळणार्‍यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरच्या राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत ठाणेदार निशीकांत रामटेके, पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे, पोलीस उपनिरीक्षक गोमिद पाटील, हेडकॉंस्टेबल खोब्रागडे, परचाके, लेनगुरे, पी. सी. मंगेश, पी. सी. ज्ञानेश्वर, नापोशी गणेश, आदिंनी राबविली. सदर मोहीम पोलिसांनी राबविल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।