गडमौशी येथील प्रवासी निवाऱ्याकडे ग्रामपंचायत चे दुर्लक्ष

0
430
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी :- गडमौशी येथील प्रवासी निवाऱ्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून   याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आहे. गडमौशी ग्रामपंचायत लगत असलेल्या कृषी विज्ञान केंद्राला लागुन प्रवासी निवाऱा आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर शेतकरी वर्ग भेट द्यायला येतात. परंतु प्रवासी निवाऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रवासी निवाऱ्याच्या सभोवताली कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले आहे. या प्रवासी निवाऱ्याच्या मागे उन्हाळ्यात वाघाने म्हैसवर हल्ला करून जखमी केले होते हे विशेष म्हणजे गडमौशी गाव हे जंगल परिसराला लागून असल्याने या प्रवाशी निवाऱ्याच्या मागील बाजूस जंगली श्वापदाचा वावर असतो त्यामुळे या निवाऱ्याची साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. या परीसरात मोठ्या प्रमाणात काडीकचरा असुन स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या ग्रामपंचायतला या प्रवाशी निवाऱ्याकडे लक्ष देण्यास तिळमात्र वेळ द्यायला ग्रामपंचायतला फुरसत नसल्याचे दिसून येते.

उत्कृष्ट सरपंचा पुरस्कार या गावातील सरपंचास मिळाला असून समोर दर्शी असणाऱ्या निवाराकडे लक्ष नसल्याचे किंवा स्वच्छ न करण्याचे ग्रामपंचायत ठरविले की काय? असा प्रश्न प्रवासी निवाऱ्याकडे पाहून पडतो.