मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्याचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा – पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे

0
553
Google search engine
Google search engine

तिर्थक्षेत्र विकासाची कामे तत्काळ पूर्ण करा 

मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखड्यात समाविष्ट असलेली विकासकामे ज्या कंत्राटरांनी अपूर्ण ठेवलेली आहे किंवा काम पूर्ण करण्यासाठी विलंब करीत आहे, अशा कत्रांटदारांवर दंड थोटवून त्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे. तसेच अपूर्ण कामे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ पूर्ण करावी, असे निर्देश कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, (29 ऑगस्ट) मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव विकास आराखडा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.‍ विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगावचे समन्वयक आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे तीर्थक्षेत्र मोझरी, श्री क्षेत्र कौंडण्यपूर व संत गाडगेबाबा यांची निर्वाणभूमी वलगाव या ठिकाणांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
मोझरी विकास आराखड्या अंतर्गत सन 2009 मध्ये 78 कोटी 64 लाख रुपये पंधरा कामांसाठी, वर्ष 2011 मध्ये 125 कोटी 21 कामांकरीता, वर्ष 2015 मध्ये 150 कोटी 83 लाख रुपये 24 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्येक यंत्रणांनाकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत 142 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, क्रीडा संकुलाचे बांधकाम, क्लब हाऊस व स्विमींग पुलाचे बांधकाम, काँक्रीट रोड व नाली बांधकाम, बाजार ओट्याचे बांधकाम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यांची निर्मिती, गुरुदेव नगर येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, सर्वधर्म प्रार्थना सभागृहाचे (मानव समाज मंदीर)बांधकाम, मोझरी गावातील रस्ते आदी कामांचा विकास आराखड्यात समावेश आहे. विकास आराखड्यातील अपूर्ण कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने पूर्ण करावी.
श्रीक्षेत्र कौडण्यपूर विकास आराखड्यांतर्गत वर्ष 2012 मध्ये 20 कोटी रुपये 14 कामांसाठी मंजूर करण्यात आले आहे. आतापर्यंत 16 कोटी 41 लाख रुपये विकासकामांवर खर्च करण्यात आले असून याअंतर्गत पर्यटक विसावा, उपहारगृह , नौकानयन व सौदर्यीकरण अंतर्गत विविध कामे, घाट बांधकाम करणे, बगीचा/बालोद्यान, उद्यान परिसरात सिंचन पध्दत विकसित करणे, व्यापारी संकुल, मंदिर परिसर विकसित करणे, प्रवेशव्दार व रिंगनसोहळा आदी कामे होणार आहेत, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वलगावं येथील संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वर्ष 2012 ला 48 विकास कामांसाठी 37 कोटी 86 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून आतापर्यंत 30 कोटी रुपये खर्चुन निर्वाणभूमीचा सर्वांगिण विकासाची कामे झाली आहेत. निर्वाणभूमीची उर्वरित अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी संबधित यंत्रणांना दिले.