आकोट तालुक्यात पोळासण उत्साहात साजरा

0
622
Google search engine
Google search engine

आकोटः- शहरासह तालुक्यात वृषभराजाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करीत बैल पोळा सण शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

शेतकरी व बैल काळ्या आईची सेवा करीत शेतात राब राबत असतात,पोळा सणालाच काय ते बैलाला उसंत मिळत असते.तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असुन पिक परिस्थीतीही चांगली आहे.त्याचा आनंद शेतक-यांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होता, शहरासह तालुक्यातील शेतक-यांनी वृषभराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत आंघोळ घातली, शिगांची रंगरगोटी केली,बैलांना सजवुन झुल आंथरुण पुजा केली पोळा भरतो त्या ठिकाणी आणले होते.अनेक शेतक-यांनी बैलांच्या पाठीवर विविध समाज प्रबोधनपर म्हणी लिहुन जनजागृती केली होती. शहरातील सोमवार वेस,नंदिपेठ, रामटेक पुरा,शिवाजी नगर,खानापुर वेस, बुधवार वेस आदि भागात बैल पोळा भरण्यात आला होता.कावड मंडळानी वाजत गाजत महादेवाची गाणी म्हणत पुर्णा नंदिवरुन आणलेले जल बैलाच्या आंगावर व उपस्थीतांचे अंगावर छिंपडले.बैल पोळा पाहण्यासाठी अबाल,वृध्दांनी मोठी गर्दी केली होती.परिसरात लहान मुलांची खेळण्याची दुकाने आदि लावण्यात आली होती.पोळा फुटल्यानंतर वृषभ राजांची महिलांनी ठोंबरा भरवीत पुजा केली.