थुगाव येथील ड्रॉ.यांचे प्रकरणात नाट्यमय रुपांतर,अजूनही ड्रॉ चौकशीच सुरू? अधिकारी कार्यवाही करण्यास का करत आहे विलंब?

0
966
Google search engine
Google search engine

थुगाव येथील ड्रॉ.यांचे प्रकरणात नाट्यमय रुपांतर,अजूनही ड्रॉ चौकशीच सुरू?
अधिकारी कार्यवाही करण्यास का करत आहे विलंब?

बादल डकरे:-चांदुर बाजार

चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर बंगाली ड्रॉ याचा प्रमाणात वाढ झाली आहे.यापैकी काही ड्रॉ यांचे पदवी आहे पण ते या ठिकाणी फक्त सराव करीत असल्याचे दाखवून आपला व्यवसाय सुरळीत चालवीत आहे.यामध्ये ग्रामीण भागातील शासकीय अधिकारी हे मुख्यलयीन राहत नसल्याने जनसामान्य व्यक्ती हे खाजगी किंवा अश्या बंगाली ड्रॉ कडे आपला उपचार घेत असतात.मात्र खाजगी ड्रॉ.संबंधित शिक्षणाची पदवी घेऊन उत्तीर्ण होऊन ग्रामीण भागात किंवा शहरात आपले दवाखाने सुरू करतात. तर बंगाली ड्रॉ अपुऱ्या माहितीनुसार हे जवळीक लोकांना हाताशी घेऊन आपला व्यवसाय सुरू करत आहे.या प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे.

दिनांक 20 ऑगस्ट ला तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका सहाय्यक गटविकास अधिकारी हे तालुक्यातील ग्राम थुगाव येथे त्यांना मिळलेल्या माहितीच्या आधारे गेले असता त्यांनी त्या गावातील ड्रॉ.सुभरोतो गुरुचंद विश्वास यांच्या त्या गावातील दवाखाना पाहणी केली.या दरम्यान पथक ला काही संदिग्धता असणारे साहित्य जप्त केले.तसेच अचानक गर्दी वाढल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त बोलावण्यात आला. मात्र या संदर्भात अध्यापही तालुका आरोग्य अधिकारी त्यांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या ड्रॉ याच्या आधी सुद्धा कार्यवाही झाली असल्याचे माहिती असून देखील कार्यवाही करण्यासाठी विलंबाने या प्रकरण ला नाट्यमय वळण मिळत आहे.या प्रकरणात विलंब होत असल्याने ड्रॉ याना कार्यवाही पासून वाचविले तर जात नाही ना अशा प्रश्न आता जोर धरत आहे.मात्र या वर अधिकारी शुद्ध माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसत आहे.

प्रतिक्रिया:-
1)आम्ही थुगाव येथे गेलो असता ड्रॉ विश्वस याच्या कडील काही संशयास्पद साहित्य जप्त केले आहे.याचा पुढील चौकशी ही आरोग्य अधिकारी करीत आहे.
ड्रॉ.प्रफुल्ल भोरखडे

2)संबंधित ड्रॉ विश्वास याना या बाबत चौकशी केली असता त्यांनी माझा त्या ठिकाणी मेडिकल असल्याचे त्यांनी सांगितले.पण आमची याबाबत चौकशी सुरू आहे.ते दुसऱ्या ड्रॉ कडे प्रॅक्टिस करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ड्रॉ. ज्योसना भगत तालुका आरोग्य अधिकारी चांदुर बाजार

बॉक्समध्ये:-
तालुक्यातील ग्रामीण पातळीवर दवाखाना उघडण्याची परवानगी ग्रामपंचायत कडून घेणे आवश्यक असते. मात्र तालुक्यातील अनेक ठिकाणी परवानगी न घेता खाजगी दवाखाने सुरू केले जात आहे.ग्राम पातळीवर पोलिस पाटील,कोतवाल,ग्रामसचिव,तंटामुक्ती अध्यक्ष,सरपंच याना याची माहिती नसल्याचे दिसून येत आहे.

दुसरा बॉक्स
याच ड्रॉ वर 2015 मध्ये पोलीसानी कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले होते त्यामुळे या ड्रॉ वर कार्यवाही साठी विलंब होत असल्याने याला अनेक प्रकरची चर्चा तालुक्यात पंचायत समिती आरोग्य विभाग बाबत सुरू आहे.