श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी मूर्ती आणि निर्माल्य हिसकावून घेणार्‍यांवर कारवाई व्हावी !

0
615
Google search engine
Google search engine

समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पोलिसांना निवेदन

 

मुंबई– गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये दीड दिवसानंतर, तसेच गौरीविसर्जन, अनंत चतुर्दशी आदी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी काही स्वयंसेवक भाविकांच्या हातातून मूर्ती आणि निर्माल्य बलपूर्वक हिसकावून घेण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. अशा प्रकारांना प्रतिबंध करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन ३१ ऑगस्ट या दिवशी माहिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गडांकुश यांना देण्यात आले. निवेदन देतांना श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळीचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, धर्मप्रेमी श्री. देवेंद्र वारेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल नाईक हे उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, श्री गणेशाची मूर्ती वहात्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यामागे भाविकांची श्रद्धा असते. कोणी स्वयंस्फूर्तीने समुद्रात किंवा वहात्या जलाशयात मूर्तीचे विसर्जन करत असेल, तर त्याला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही; मात्र भाविकांच्या अनुमतीविना त्यांच्याकडून मूर्ती हिसकावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही.

भाविकांकडून मूर्ती हिसकावून घेतांना ओढाताण होऊन मूर्ती भंगण्याचे वा वादाचे प्रसंग होऊन तेथील वातावरण तणावग्रस्त होऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे श्री गणेशमूर्ती आणि निर्माल्य वहात्या जलाशयात विसर्जन करणे, हा धार्मिक विषय असून भाविकांच्या श्रद्धेशी जोडला आहे. तरी या प्रकारात आपण गांभीर्याने लक्ष घालून अशा प्रकारांना प्रतिबंध घालावा.